पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा, VIDEO
Devendra Fadnavis on Maratha ReservationSaam TV

Devendra Fadnavis Video: मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यास वेळ नाही, विरोधकांनी आपले रंग दाखवले: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Maratha Reservation: आज मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला. यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर टीका केली आहे.
Published on

विरोधकांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काही देणंघेणं नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला. ही बैठक सोडून विरोधक राजकीय बैठक घेत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''आजची बैठक ही जातीय सलोखा राखण्यासाठी आयोजित केली होती. बैठकीला उपस्तीथनी ज्या काही सुचना मांडल्या आहेत, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ते निर्णय घेतील.''

पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा, VIDEO
Fish Viral Video: मुंबई लोकलच्या ट्रॅकचा झाला फिश टॅंक, रुळावर साचलेल्या पाण्यात पोहोतायत मासे; पाहा व्हिडिओ

ते म्हणाले, या बैठकीला मला वाटले होते की, शरद पवार तरी उपस्थित राहतील. मात्र महाराष्ट्र पेटत राहावा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजत राहावी, अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती. मात्र ऐनवेळी विरोधीपक्षाने, मविआने या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांना मराठा आरक्षणासारख्या विषयासाठी वेळ नाही, मात्र विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर राजकीय बैठक करायला वेळ आहे.''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ''अतिशय महत्वाच्या विषयावर बैठक आयोजित केली होती. सर्वपक्षांना निमंत्रण दिले होते. सर्व येणार होते, पण राज्यात जे काही दोन समाजात वातावरण तयार झालं आहे. राज्य असेच पेटत राहावं, जातीय तेढ निर्माण राहावी, अशी मविआची भूमिका त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झाली आहे.''

पाऊस असेल त्या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया रद्द; गृहमंत्री फडणवीसांची घोषणा, VIDEO
Maharashtra Rain News: रेड अॅलर्ट, शाळांना सुट्ट्या, पण अतिमुसळधार नाहीच! अंदाज चुकला? हवामान खात्याचं म्हणणं काय?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''अशीच एक बैठक १ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली होती. दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही. पण मविआला या दोन्ही समाजात संघर्ष आणि तेढ कायम राहावी आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी, ही त्यांची भूमिका समोर आली आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com