

रश्मी पुराणिक
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आज सभागहात भाजपा सदस्यांवर चांगलेच संतापले होते. सभागृहात नेहमी शांत असणारे जयंत पाटील यांनी खाली बसून बोलणाऱ्या भाजपा सदस्यांनाही सुनावले. सभागृहातील अनुपस्थितीचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावरुनही त्यांनी सुनावले आहे. तसेच काश्मीर फाईल्स चित्रपटावरून या दोघांत चांगलीच जुंपली होती. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून जयंत पाटील विरुद्ध फडणवीस अशी खडाजंगी सभागृहात पहायला मिळाली.
मंगळवारी सभागृहात भाजपाचे सदस्य उपस्थित नव्हते. या मुद्द्याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल, “आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो, ‘डंके के चोटे पे’ गेलो. आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे” असे सांगितले, यावर संतापलेल्या जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे.
“काश्मीर फाईल्स हा सिनेमा इंटर्वलनंतर बोरिंग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही, फक्त निर्मात्याकडे 160 कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मिरी पंडितांना घरं बांधण्यासाठी दान करायला सांगा", अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली आहे.
काश्मीर फाईल्स हा चित्रपट सर्वांनी बघावा-फडणवीस
“काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर मी स्तब्ध आणि निशब्द ही आहे. मी मानतो की, प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. विशेषकरून आपले सुडो सेक्युलर्स आहेत यांनी हा चित्रपट पाहावा कारण जाणूनबुजून त्यांनी इतिहासातील हे पान डिलीट करण्याचे काम केले आहे. काश्मीरचे सत्य चित्रपटाच्या निमित्ताने समोर आले आहे. हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असे मला वाटत नाही. उलट मी हे मानतो की, या देशात खोटे चित्र उभे करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असो, प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट बघितला पाहिजे. पंतप्रधानांनी ३७० कलम हटवून देशात कोणती क्रांती आणली हे जर समजून घ्यायचं असेल तर काश्मीर फाईल्स पाहिला पाहिजे,” असं फडणवीस चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.