सुरज सावंत, सुशांत सावंत
मुंबई: फेसबूक लाईव्ह करुन आत्महत्या केलेल्या पंढरपूर मधील सूरज जाधव या शेतकऱ्याचा मुद्दा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लक्षवेधीद्वारे विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सरकारवर (government) अनेक गंभीर आरोप केले. यानंतर सभागृहाच्या स्थगित झाल्यावर बाहेर आल्यानंतर देखील विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शेतकरी विरोधी सरकार म्हणत ठाकरे सरकारवर निशाण साधला आहे. (Devendra Fadnavis Latest News)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विजेचे कनेक्शन कापल्याने सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सूरज या तरुण शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली. ही गंभीरबाब आम्ही सभागृहात उपस्थित केली. तर तो एकटा नाही. कोट्यवधी शेतकऱ्यांची भावना समोर आली आहे. संवेदनशीलता दाखवत सरकारने वीज कापनी बंद करावी, ही मागणी आम्ही लावून धरली. पण हे सरकार मुंबईच्या (Mumbai) विकासकांना सुट देतय, बिल्डरांना सूट देऊ शकत, दारू विक्री करणाऱ्यांना सुट देतयं. हे बेवड्यांकरता पोलिसी देऊ शकत. पण हे ठाकरे सरकार (Thackeray Government) शेकऱ्यांच्या नापिकीच्या, वीज कनेक्शन कापू नका, थकबाकीच्या विनंतीला न मानता सरसकट वीज कनेक्शन कापून सुरु आहे."
पुढे ते म्हणाले आहेत की, "आम्ही निदर्शनास आणून दिले की, उपमुख्यमंत्रयांनी दोन वेळा सभागृहात आश्वासन दिले की, आम्ही वीज कापणार नाही. शेवटचं आश्वासन दिले की, शेतकऱ्यांनी ५००-७०० रुपये जरी भरले तरी आम्ही मे महिन्यापर्यंत वीज कनेक्शन कापणार नाही. परंतु त्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही. ऊर्जामंत्रांनी उपमुख्यमंत्री यांच्या शब्दाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. या पवित्र सभागृहाचे अपमान करत सर्रास कनेक्शन कापणे सुरु आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
ते म्हणाले, "आज एकीकडे वीक कनेक्शन कापले जात आहेत, दुसरीकडे DP वरच्या ६ शेतकऱ्यांनी बिल भरले असले आणि दोन शेतकऱ्यांनी बिल बहरले नसले तरी DP काढून नेली जाते. सगळ्याच शेतकऱ्यांना अडचणीत ठेवले जाते आहे. हात तोंडाशी आलेले पीक अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि हाच असंतोष आम्ही सभागृहात मांडत होतो."
हे देखील पहा-
"काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार देखील पोट तिडकीने हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की वीक कनेक्शन कापणे बंद करा पण त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली, आणि आम्हालाही हा मुद्दा मांडू देण्यात आला नाही. यावेळी, सरकारने कुठलाही रिस्पॉन्स न देता पळ त्यांनी काढला. आणि शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे. एक सुरज फेसबुक लाईव्ह करत देवाघरी गेला आमचं एवढंच म्हणणं आहे, टोकाचे पाऊल उचलू नका. आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करू. आणि कुठल्याही परिस्थिती हे शेतकऱ्यांविरोधी कोडग सरकार आहे. या सरकारमध्ये केवळ वसुली आहे. सुलतानी वसुली आहे. अस्मानी संकटापेक्षा सुलतानी मोठं आहे. त्या शेकऱ्याचा पाठीशी आम्ही उभे आहोत. आमचा संघर्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर सतत सुरु आहे. या शेतकरीविरोधी ठाकरे सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो," असा घणाघात सरकारवर फडणवीसांनी यावेळी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.