Ram Madir Opening Ceremony : २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ram Mandir Opening : सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Ram Madir Opening Ceremony
Ram Madir Opening CeremonySaam TV
Published On

सूरज मसूरकर

Mumbai News :

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभर २२ उत्सवाचा वातावरण असणार आहे. त्यामुळे २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राम मंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे. खासगी आस्थापनांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, असं अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Ram Madir Opening Ceremony
Uddhav Thackeray: राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं; म्हणाले,"फक्त रामाच्या भक्तांना..."

शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम जन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मागणीचे पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. २२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे.

Ram Madir Opening Ceremony
PM Modi News : नरेंद्र मोदी २०२४मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, ब्रिटनच्या 'द गार्डियन' वृत्तपत्राचा दावा

त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com