Maharashtra Politics: ठाकरे-शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून सोशल मीडियावर वादावादी, पोलिसांत तक्रार नोंद, काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वाद हा सोशल मीडियापर्यंत जाऊन पोलिसांत पोहचल्याची घटना समोर आली आहे.
File photos
File photos Saam tv
Published On

Mumbai Political News:

शिवसेनेच्या दोन्ही गटाने आगामी दसरा मेळाव्यासाठी तयारी केली आहे. यंदा शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे, तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदान किंवा क्रॉस लेन मैदानावर होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाची मैदाने ठरली असली तरी वाद कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वाद हा सोशल मीडियापर्यंत जाऊन पोलिसांत पोहचल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. (Latest Marathi News)

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून पालिकेत अर्ज केला होता. मात्र कालांतराने आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. हिच पोस्ट सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर-गुरव यांनी शेअर केली.

प्रिया सरवणकर-गुरव यांच्या त्या पोस्टवर दादरमधील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी संदीप पाटील यांनी 'उशिर सुचलेलं शहानपण' अशी कमेंट केली.

File photos
Maharashtra Rain Update: हुsssssश! 'ऑक्टोबर हिट'पासून दिलासा मिळणार; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता, कुठे पडणार पाऊस?

याच कमेंटवरून आमदार सदा सरवणकर यांची कन्या आणि दादरच्या महिला विभागप्रमुख प्रिया सरवणकर-गुरव यांनी फेसबुक मेसेंजरवरून मेसेज करत मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे

या प्रकरणी पाटील यांनी दादरच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना पत्र लिहित प्रिया सरवणकर यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे.

प्रिया सरवणकर गुरव यांनी मेसेजमध्ये महिलांच्या पोस्टवर कमेंट करून पुरुषत्व व सिद्ध करून दाखवण्यापेक्षा लोक कल्याणाची काम करून आपलं पुरूषत्व सिद्ध करा. पोस्टवर कमेंट करून निवडणुका जिंकता येत नाहीत. लोकांमध्ये जाऊन काम करा आणि जनहिताची काम शेअर करा. माझा पोस्टवर फालतू कमेंट कराल तर घरात घुसून मारेन, अशा आशयचा मेसेज पाटील केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

File photos
PM Modi In IOC Session: 2036 मध्ये भारतात होणार ऑलिम्पिक, आयोजनात कोणतीही कसर सोडणार नाही: पंतप्रधान मोदी

सरवणकर कुटुंब पुन्हा चर्चेत

तत्पूर्वी, गेल्या वर्षी गणेशोत्सवात झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांना हातात पिस्तुल घेऊन वावरताना पाहिले. त्यांच्या पिस्तुलीतून गोळीबारही झाला. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी सरवणकरांची पिस्तुलही जप्त केली होती. दरम्यान, या घटनेमुळे सरवणकर कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com