''दादा भुसे हे निगेटिव्हिटी असणारे मंत्री आहे. त्यांच्यबद्दल सुहास कांदे आणि इतर सगळे आमदार सांगितली की, दादा भुसे हे आमदारांशी व्यवस्थितपणे वागत नाहीत'', असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले आहेत.
आज विधीमंडळ आवारातच महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाला. विधीमंडळ आवारात हा वाद झाल्याचे सांगितले जाते. यामध्ये भरत गोगावले आणि शंभुराज देसाईंनी मध्यस्थी करत हा वाद निवळण्याचा प्रयत्न केला. यानंतर माध्यमांशी बोलताना या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या घटनेबद्दल सांगताना ते म्हणाले, ''आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली सव्वा वर्ष आमदार म्हणून काम करत आहोत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आम्हला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. मात्र मंत्री असणारे दादा भुसे यांच्या खात्याकडे एका कामानिमित्त सातत्याने मी पाठपुरावा करत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही त्यांना फोन करून हे काम करून घ्या म्हणून सांगितलं होतं. मात्र त्यांना सांगून सुद्धा ते काम झालं नाही. याचबद्दल मी त्यांना आज विचारायला गेलो असता ते माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही प्रामाणिकपणे आहोत.'' (Latest Marathi News)
महेंद्र थोरवे म्हणाले, ''मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना जबाबदारी दिली आहे. त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत. अशा पद्धतीने अॅरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. यावेळी मी त्यांना स्पष्टपणे बोललो की, मी काय तुमच्या घरी खायला येत नाही आहे. मी सांगितलेलं काम जे आहे, ते जनतेचं काम आहे. हे माझं मतदारसंघातील काम आहे, ते झालं पाहिजे. याचबद्दल मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. मात्र त्यांची देहबोली आणि पाहण्याचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा होता. म्हणून आमच्यात थोडीशी शाब्दिक चकमक झाली.''
ते पुढे म्हणाले की, ''ते मोठ्या आवाजात माझ्याशी बोलले. त्यावेळी मी त्यांना बोललो, माझ्याशी अशा पद्धतीने बोलू नका, आम्हीही आमदार आहोत. आम्ही तुम्हाला मंत्री केलं. आमदारांमुळेच मंत्री होत असतात. तुम्ही आमदारांचा सन्मान केला पाहिजे. आम्ही ३, ३.५ लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. आम्ही सभागृहात जनतेची कामे मंत्र्यांकडून करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याचाच पाठपुरावा करत असतो. मुख्यमंत्री आमच्या प्रत्येक कामासाठी फोन करत असतात. मात्र मंत्री अशा पद्धतीने वागतात, याचं दुःख होतं. म्हणून आमदार म्हणून थोड्या प्रमाणात तिथे रिअॅक्ट झालो.''
याच संदर्भात दादा भुसे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले आहेत की, माझे सहकारी मित्र आमदार महेंद्र थोरवे आणि माझ्यात काही वाद झाले अशा बातम्या चालवल्या गेल्या. मात्र यात तथ्य नाही. थोरवे हे माझे मित्र आहेत. आमच्या पक्षाचे सहकारी आमदार आहेत. असा कुठलाही प्रकार येथे झालेला नाही. या सर्व प्रकाराचं मी खंडन करतो.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.