Cyrus Poonawalla : सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका, यशस्वीपणे अँजिओप्लास्टी पूर्ण

Cyrus Poonawalla Suffers Cardiac Arrest: सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका, यशस्वीपणे अँजिओप्लास्टी पूर्ण
Cyrus Poonawalla
Cyrus PoonawallaSaam Tv
Published On

Cyrus Poonawalla Suffers Cardiac Arrest:

देशातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस एस. पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. पूनावाला यांना 17 नोव्हेंबरच्या सकाळी हृदयविकाराच्या सौम्य झटक्याची लक्षणे दिसू लागल्यावर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांची यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली.

काय म्हणाले डॉक्टर?

रुबी हॉल क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. परवेझ ग्रांट यांनी सांगितले की, सायरस पूनावाला यांची प्रकृती आता बरी होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyrus Poonawalla
Delisle Road Bridge: डीलाईल रोड ब्रिजचं केलं उद्घाटन, आदित्य ठाकरेंवर दाखल होणार गुन्हा?

रुग्णालयाचे सल्लागार अली दारूवाला यांनी सांगितले की, सायरस पूनावाला यांना गुरुवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. शुक्रवारी सकाळी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. परवेझ ग्रांट, डॉ. मॅकले आणि डॉ. अभिजीत खर्डेकर यांच्या देखरेखीखाली डॉ. पूनावाला यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Latest Marathi News)

पूनावाला यांच्या कंपनीने बनवली होती कोरोनाची

सायरस यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात कोविशील्ड लस तयार केली होती, ज्यामुळे सर्व लोकांना मोफत कोरोना लस उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात सरकारला यश आले होते.

Cyrus Poonawalla
Nimisha Priya: भारतीय महिलेला येमेनमध्ये सुनावण्यात आली मृत्युदंडाची शिक्षा, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पूनावाला यांना पद्मविभूषणने करण्यात आलं आहे सन्मानित

सायरस पूनावाला हे 82 वर्षांचे आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते SII चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत. त्यांनी SII ही भारतातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी बनवली आहे. पूनावाला यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. पूनावाला यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com