Pune News: सायबर चोरट्यांची हिमंत वाढली; थेट जिल्हाधिकाऱ्यांना केलं टार्गेट

सायबर चोरट्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट केलं आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv
Published On: 

अक्षय बडवे

Cyber Crime News: पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सायबर चोरटे फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या करुन लोकांना गंडा घालत असतात. एखादी बाब लोकांच्या लक्षात आली व लोक सावध होऊ लागले की लोकांना गंडा घालण्यासाठी दुसरा फंडा वापरला जातो.

बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणे हा प्रकार तर अलिकडे नित्याचेच झाले आहेत.असाच आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या सायबर चोरट्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट केलं आहे.(Latest Marathi News)

Pune News
Maharashtra Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; इथे चेक करा तुमच्या शहरातील दर

पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावानेच बनावट अकाऊंट उघडल्याची खळबळजनक बाब आली आहे. या प्रकरणी डॉ. राजेश देशमुख यांनी याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) माही वर्मा या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटवरून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले होते. तसेच देशमुख यांच्या मूळ अकाऊंट वरील अनेकांना या अकाऊंटवरून रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. (Pune News)

Pune News
Bacchu Kadu News : बच्चू कडूंनी आशा सोडली; म्हणाले, मला नाही वाटत मंत्रिमंडळ विस्तार होईल

दरम्यान, याआधी २ वेळा राजेश देशमुख यांचे नाव वापरून काही अज्ञातांनी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com