सुरुवातीला मैत्रीपूर्ण प्रेमाचं भाव, नंतर खंडणीखोर खेळतात सेक्सटॉर्शनचा डाव

सोशल मीडियावरील न्यूड कॉलिंगमुळे तरुण अडकतात सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात
Cyber Police Pune
Cyber Police PuneSaam Tv

पुणे - पुणेकर तरुण सेक्सटॉर्शनच्या विळख्यात अडकत चालले आहेत. सोशल मीडियावरील (Social Media) न्यूड कॉलिंगच्या माध्यमातून खंडणीखोर तरुणांकडून लाखो रुपये उकडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षभरात जवळपास 682 तरुणांनी पुणे सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) सेक्सटॉर्शनच्या तक्रारी केल्या आहेत. (Pune Crime News)

हे देखील पहा -

सोशल मीडियावर एखाद्या तरुणाला सुरुवातीला मुलीचं नाव आणि सुंदर प्रोफाइल फोटो असलेल्या अकाउंटवरून फ्रेड रिक्वेस्ट पाठवण्यात येते. त्यानंतर त्या व्यक्तीशी मैत्री करून त्याल व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियावर न्यूड कॉलिंग करण्यास आकर्षित केलं जातं. तरुणाने न्यूड व्हिडियो कॉल केला की, खडणीखोर स्क्रीन रेकॉडरने पीडित तरुणांचा न्यूड व्हिडियो रेकॉर्ड करून त्याला भीती दाखवत लाखो रुपये उकडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा अनेक तक्रारी सध्या पुणे सायबर पोलिसांकडे येत आहेत.

Cyber Police Pune
Nashik Election: सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे भरत वाघमारे

तसेच दुसरीकडे राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश मधील काही महिला आणि पुरुष आपल्या राज्यातील तरुणांना सेक्स टॉर्शनच्या विळख्यात अडकवत आहेत. त्यामुळे अशा सोशल मीडियावरील न्यूड कॉलिंग पासून सावधान राहण्याचं आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com