Nashik Election: सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे भरत वाघमारे

उपाध्यक्षपदी माकपच्या माधवी राहुल थोरात यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आहे.
Nashik Election
Nashik ElectionSaam Tv

नाशिक - नाशिक नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat)अखेर आज सुरगाणा येथे शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे (Shivsena) भरत वाघमारे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी माकपच्या माधवी राहुल थोरात यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आहे. सुरगाण्याच्या नवनिर्वाचित भाजप नगरसेविकेचा हृदयविकाराने निधन झाले होते.

हे देखील पहा -

कासुबाऊ पवार यांच्या निधनानंतर भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेना-माकप यांची सदस्य संख्या सारखीच झाली. दोन्ही गटांची सदस्य संख्या सारखी झाल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर ईश्वर चिट्ठीद्वारे नगराध्यक्ष, उप नगराध्यक्षपदाची निवड यांची निवड करण्यात आली. त्यामुळे सत्तेसाठी संख्याबळ मिळवूनही नगरसेविकेच्या मृत्यूमुळे भाजपनं सत्ता गमावली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com