Crocodile in Mithi river : मुंबईतल्या मिठी नदीत ८ फुटांची मगर; नागरिकांचं टेन्शन वाढलं, पाहा व्हिडिओ

Crocodile in Mithi river near bkc : मुंबईतल्या कुर्ल्याजवळील मिठी नदीत ८ फुटांची मगर आढळली आहे. मगर आढळल्यानंतर नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे.
मुंबईतल्या मिठी नदीत ८  फुटांची मगर आढळली; नागरिकांचं टेन्शन वाढलं
Crocodile in Mithi riverSaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं. मुंबईतील मिठी नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. याच मिठी नदीत ८ फुटी अजस्त्र मगर आढळली आहे. मगर आढळल्याने नागरिकांची टेन्शन वाढलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या बीकेसीतील धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात 8 फुटी मगर दिसली आहे. मगर आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. दोन दिवसांतील मुसळधार पावसादरम्यान आढळलेल्या मगरीमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

मुंबईतल्या मिठी नदीत ८  फुटांची मगर आढळली; नागरिकांचं टेन्शन वाढलं
Meghna Bordikar Video Viral News : भाजपच्या महिला आमदाराने फाईलमध्ये पैसे ठेवले? Video Viral

मगर आढळल्यानंतर वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशनकडून वन विभाग आणि RAWW संस्थेच्या मानद वन्य-जीव रक्षकांनाही ही माहिती कळविण्यात आली आहे. मगर आढळून आल्यानंतर वनविभागाने ताबडतोब सदर ठिकाणी पाहणी केली. मुंबईत मागील दोन दिवसांच्या पावसादरम्यान मुसळधार पाण्याच्या प्रवाहात ही मगर वाहत आली असावी, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईतल्या मिठी नदीत ८  फुटांची मगर आढळली; नागरिकांचं टेन्शन वाढलं
Viral Video : Viral Video : आरारारा खतरनाक! अचानक व्हेल माशानं मारली उडी, समुद्रात बोटीची कोलांटी उडी, व्हिडिओ बघा!

तसेच ही मगर मानवी वस्तीत नसून तिच्या नैसर्गिक अधिवासातच आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. सध्या या मगरीचा शोध घेण्याचं काम विभागाने सुरु केले आहे.

रायगडमध्येही रस्त्यावर आढळली होती ८ फुटांची मगर

रायगडच्या चिपळून तालुक्यातील शिवनदीजवळ काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसादरम्यान रस्त्यावर मगर आढळली होती. रस्त्यावरील ही मगर ८ फुटांची होती. या मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात मगरींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com