अंबरनाथमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यासाठी अॅम्ब्युलन्स वापरण्यात आली
वेळीच अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मीनाबाई सुर्यवंशी यांचा मृत्यू
या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे
चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कारवाईची मागणी सुरू आहे
अंबरनाथमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स वापरण्यात आल्याने एका गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव मीनाबाई सुर्यवंशी असे असून त्यांना उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान वेळीच अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने हा प्रकार घडला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, स्वामी नगर येथील मीनाबाई सुर्यवंशी यांना अचानक प्रकृती बिघडल्याने छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला, मात्र रुग्णालयातील एकमेव उपमुख्यमंत्र्यांच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्याचे समोर आले.
अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मौल्यवान वेळ वाया गेला आणि उपचाराआधीच मीनाबाई यांचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून, आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजसेवक महेश इनकर यांनी याला “मानवतेला काळिमा फासणारी घटना” असे म्हणत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून, जिल्हा आरोग्य विभागाने अॅम्ब्युलन्स व्हीआयपी सेवेसाठी कोणी वळवली याची चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ही घटना ‘व्हीआयपी प्रोटोकॉल विरुद्ध जनतेचे प्राण’ या वास्तवावर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.