Mumbai Crime News: मोबाईलपुढे आयुष्य हरलं; आई-वडील ओरडले म्हणून अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं

Mumbai News : मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात गेट नंबर 8 येथे ही घटना घडली आहे.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

संजय गडदे

Mumbai News : मोबाईलच्या अतिवापरमुळे पालक रागावले म्हणून एका अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना मुंबईत समोर आली आहे. इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून या मुलीने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात गेट नंबर 8 येथे ही घटना घडली आहे.

मुलगी मोबाईल अति प्रमाणात वापरत असल्यामुळे पालकांनी तिला समज दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या मुलीने लिबर्टी गार्डन परिसरात येऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीला लॉकडाऊन काळापासून मोबाईल वापराची सवय लागली होती. ती सतत इंस्टाग्रामवर रिल बनवून टाकत असल्याने आई-वडिलांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला होता. यामुळे मुलगी मागील सहा महिन्यापासून तणावात होती. (Crime News)

Crime News
Mumbai Crime News : घरासमोर उभ्या केलेल्या बुलेट बाईकची चोरी, गाड्यांची निगा राखणाराच निघाला चोर

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलीची मालवणी पोलीस ठाणे येथे मिसिंगची तक्रार दाखल झाली होती. या मुलीने दोनच दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याची धमकी पालकांना दिली होती व आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले होते. मालवणी परिसरात राहणारी ही मुलगी मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात वेगवेगळ्या चार इमारतीवर आत्महत्या करण्यासाठी गेली होती. (Latest Marathi News)

मात्र त्या ठिकाणी तिला टेरेसवर जाण्याचा मार्ग बंद असल्यामुळे शक्य झाले नाही. अखेरीस सुमित्रा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून या अल्पवयीन मुलीने आठ तारखेच्या सायंकाळी साधारणपणे पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

Crime News
Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून टोलवसुली; आधी रस्ता पूर्ण करा नंतर टोल घ्या, स्थानिकांची मागणी

याप्रकरणी मालाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक चौकशी केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांना बोलावून त्यांचा जबाब नोंद करून घेतला. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळापासून मुलीला मोबाईलच्या अति वापराची सवय लागली होती. सतत मोबाईलवर रील बनवून टाकत असल्यामुळे मुलीचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. यामुळे सहा महिन्यापूर्वीच तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतल्यापासून ती तणावात होती व तिच्यावर उपचार देखील सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com