Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून टोलवसुली; आधी रस्ता पूर्ण करा नंतर टोल घ्या, स्थानिकांची मागणी

Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गावरील हा पहिलाच टोल नाका आहे.
Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून टोलवसुली; आधी रस्ता पूर्ण करा नंतर टोल घ्या, स्थानिकांची मागणी
Published On

Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मात्र तरीही मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली आजपासून सुरु झाली आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल वसुली आजपासून सुरू होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील हा पहिलाच टोल नाका आहे. या मार्गावर असणाऱ्या टप्प्याचं कां पूर्ण झाल्यानं हा टोल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 डिसेंबरला हा टोल नाका सुरु करण्यात आला होता. मात्र 22 डिसेंबरला स्थानिकांच्या विरोधामुळे टोल वसुली बंद करण्यात आली होती. माजी खासदार निलेश राणे आणि सर्वपक्षीय आंदोलन या टोलसाठी करण्यात आले होते. (Latest Marathi News)

Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून टोलवसुली; आधी रस्ता पूर्ण करा नंतर टोल घ्या, स्थानिकांची मागणी
Saamana Editorial News: सुडाच्या राजकारणात रमलेल्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी वेळ नाही; सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

आधी रस्ता पूर्ण करा नंतर टोल घ्या अशी स्थानिकांची मागणी होती. मात्र या भागातील काम 98 टक्के पूर्ण झाल्यानं हा टोल सुरु करण्याचा निर्णय कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडियाने घेतला आहे.त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता टोल भरवा लागणार आहे.

Mumbai-Goa Highway Toll: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून टोलवसुली; आधी रस्ता पूर्ण करा नंतर टोल घ्या, स्थानिकांची मागणी
IPL 2023 News : RCBने सचिनचं ट्वीट पाहिलं नाही वाटतं? लखनौच्या विजयानंतर सचिनचा अंदाज खरा ठरला

वाहनांवरील टोल किती असेल?

>> कार- 90 रुपये (वन वे), 130 रुपये (रिटर्न)

>> एलसीवी (लाईट मोटर वेहिकल) - 140 रुपये (वन वे), 210 रुपये (रिटर्न)

>> ट्रक, बस - 295 (वन वे), 445 (रिटर्न)

>> 3 एक्सल - 325 (वन वे), 485 (रिटर्न)

>> हेवी ट्रक - 465 (वन वे), 695 (रिटर्न)

>> ओव्हर साईझ एक्सल - 565 (वन वे), 850 (रिटर्न)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com