Online Fraud News : मॅट्रिमोनिअल साइटवर ३३ वर्षांच्या तरुणीनं शोधला इंग्लंडचा जोडीदार, नंतर असं घडलं की डोकंच गरगरलं

Thane News : सायबर गुन्हेगारांनी तरुणीची 4.57 लाखांची फसवणूक केली आहे.
Online Fraud
Online FraudSaam tv
Published On: 

Thane News : मॅट्रिमोनिअल साईटवरुन जीवनसाथी निवडण्याचा प्रयत्न एका तरुणीला चांगलाच महागात पडला आहे. सायबर गुन्हेगारांनी तरुणीची 4.57 लाखांची फसवणूक केली आहे.

लंडनमध्ये सिव्हिल इंजिनीअर असल्याचे भासवून एका सायबर ठगाने ठाण्यातील एका 33 वर्षीय तरुणीची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने तिचे प्रोफाइल मॅट्रिमोनिअल साइटवर पोस्ट केले होते.

त्यानुसार तिला आरोपीकडून रिक्वेस्ट मिळाली. ठगाने स्वत:ची ओळख इंग्लंडमधील एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणारा सिव्हिल इंजिनियर आहे अशी दिली. (Crime News)

Online Fraud
Uttar Pradesh Crime News: 'घरी मी एकटाच आहे, तू ये...'; नकार मिळताच पोलीस आणि तरुणीमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

नंतर आरोपीने तरुणीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आरोपीच्या फोन नंबरवर इंग्लंडचा कन्ट्री कोड होता. त्यानंतर दोघेही फोनवर गप्पा मारायला. दरम्यान, त्याने तरुणीला काही भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले आणि तिला कुरिअर ट्रॅकिंग आयडीही दिला.

त्यानंतर पीडित तरुणीला एका महिलेचा फोन आला. समोरील तरुणीने तिला सांगितले की ती दिल्ली विमानतळावरून बोलत आहे. तिच्या नावावर एक पार्सल आहे आणि तिला 38,500 रुपये त्यासाठी भरावे लागतील. (Latest news Update)

Online Fraud
IT Dept. On Social Media Influencer: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आयकर विभागाच्या रडारवर; अनेकांची चौकशी होणार?

इंग्लंडमधील असल्याचं भासणाऱ्या भामट्याने ही तरुणीला पैसे भरावे लागतील असंच सांगितलं. अशारीतीने विविध कारणे सांगून पीडित तरुणीकडून आरोपींनी 4.57 लाख रुपये उकळले. मात्र आपली एकप्रकारे फसवणूक होतेय हे कळेपर्यंत उशीर झाला होता. तरुणीने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.