ज्ञानेश्वर चौतमल, पुणे
Pune News: पुण्यातील (Pune) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाची रवानगी पोलीस कोठडीमध्ये (Police Custody) करण्यात आली आहे. आरोपी शंतनु जाधवला आज पुणे सत्र न्यायालयात (Pune Session Court) हजर करण्यात आले होते. न्यायालयाने शंतनुला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून (Pune Police) सुरु आहे.
पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीवर तिच्याच मित्राने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुणी आणि तिचा मित्र जखमी झाला आहे. दोन तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणीचा जीव वाचवला. याप्रकरणाने पुणे शहर हादरले. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आरोपी शंतनु जाधवला अटक केली. त्यानंतर आज त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयता हल्ला करण्यात आला आहे. तरुणी आणि हल्लेखोर एकमेकांना ओळखतात. मंगळवारी तरुणी आपल्या मित्रासोबत स्कूटरवरुन कॉलेजला निघाली होती. त्याचवेळी सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस ठाण्याच्या जवळ आरोपी शंतनुने त्यांना अडवले. त्यानंतर शंतनुने आपल्यासोबत बॅगेमध्ये आणलेला कोयता काढला आणि हल्ला करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तरुणीच्या मित्रावर वार केले. त्यानंतर त्याने तरुणीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. तरुणीने पळण्याचा प्रयत्न केला पण आरोपीने तिचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला केला.
तरुणीच्या डोक्यावर आरोपी कोयत्याने वार करणार तोवर जवळून जाणाऱ्या दोन तरुणांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून तरुणीला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सध्या सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. या घटनेचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे. पुण्याच्या या घटनेमुळे राजकारण देखील तापले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.