Corona Patients in Mumbai
Corona Patients in MumbaiSaam TV

मुंबईत आज कोरोनाचा विस्फोट; आजचा रिपोर्ट धडकी भरवणारा

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १,०६५,८०२ वर पोहोचली आहे.
Published on

मुंबई : देशातील कोरोना संकट गेलं असं वाटत असतानाच, मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना विषाणूचा (corona) संसर्ग वाढताना दिसतं आहे. मुंबईत आता दिवसभरात ५०० च्या वरती कोरोना रुग्ण सापडल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज दिवसभरात ५०६ नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद करण्यात आली आहे.

नव्याने आढळलेल्या ५०६ कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील (Mumbai) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या खाली होती. मात्र, आज नव्या रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या १९,५६६ वरती स्थिरावली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १,०६५,८०२ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज ४८९ रुग्ण हे लक्षणविरहीत आढळले आहेत. तर आज एकूण १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील जनतेने मास्क (Mask) वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मागील काही दिवसांमध्ये केलं होते. त्यामुळे आता नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्क रहायला हवं आणि योग्य ती काळजी घ्यायला हवी.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com