'शिवसेना, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची फरपट; काँग्रेसने नागपूरात अधिवेशनासाठी प्रयत्न करायला पाहिजेत'

काँग्रेसला विदर्भातील जनतेने जनाधार दिला आहे. तरी देखील काँग्रेस अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाही.
'शिवसेना, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची फरपट; काँग्रेसने नागपूरात अधिवेशनासाठी प्रयत्न करायला पाहिजेत'
'शिवसेना, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची फरपट; काँग्रेसने नागपूरात अधिवेशनासाठी प्रयत्न करायला पाहिजेत'SaamTV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) हे नागपूरमध्ये न घेता ते मुंबई मध्ये घेण्यात येणार आहे. यावरुनच भाजपने महाविकास आघाडीवरती (BJP on MVA) जोरदार निशाना साधला असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) अधिवेशनावरुन काँग्रेस नेत्यांवरती निशाना साधला आहे.

हे देखील पहा -

नागपूर अधिवेशन हे मुंबईमध्ये घेण्याचे कारण काय ? असा सवाल आपण सरकारला विचारला असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीचे कारण दिले आहे. मात्र काँग्रेसला विदर्भातील जनतेने जनाधार दिला आहे. तरी देखील काँग्रेस अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. अशी टीका त्यांनी काँग्रेसवरती केली आहे.

'शिवसेना, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची फरपट; काँग्रेसने नागपूरात अधिवेशनासाठी प्रयत्न करायला पाहिजेत'
नवाब मलिकांवरती 1000 कोटींचा दावा; 6 आठवड्यात बाजू मांडण्याची मुदत

तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची फरपट होत आहे. असल्याच वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं. तसेच 2 वर्षाच्या फसवणूकीचा पर्दाफाश आम्ही करू म्हणून हे पळ काढत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातले आहेत त्यांनी तरी अधिवेशन नागपुरमध्ये घेण्यासाठी बोलले पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. तसेच हे सरकार अधिवेशनापासून पळ काढत असून सरकार चर्चेला तयार नसल्याचही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com