Pune Ravindra Dhangekar Congress News : पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऑफर देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी धंगेकर यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत धंगेकरांना ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपासून धंगेकर आणि अजित पवार यांची भेट झाली होती. रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. धंगेकर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करू शकता अशी ऑफर रूपाली ठोंबरे यांनी धंगेकर यांना दिली आहे. रवी भाऊ अजित दादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहेत, ते तू अनुभवले आहेत, अशी पोस्ट ठोंबरे यांनी लिहिली आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार का? याची चर्चा पुण्यातील राजकारणात सुरू आहे.
काय आहे रूपाली ठोंबरे यांची पोस्ट?
मा.आमदार रवी भाऊ आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पण विचार करू शकता की.
मा.आमदार श्री.रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते,सक्षम लोकप्रतिनिधी. निवडणुकीत हार जीत चालतच असते. नेतृत्व,कामाची पद्धत थांबत नसते.भाऊ तुझ्या सोबत काम केले आहेच. काही दिवस बातमी येत आहे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात,कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात.
रवी भाऊ मा.अजित दादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहे ते तू अनुभवले आहेत. तुझ्यासारखे काम करणारा,सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाचा कार्यकर्ता,लोकप्रनिधिनी नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल. बाकी पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते,काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहीण भाऊ नाते कायम आहेच.
रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार ?
रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे म्हटले जाते. रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. मंगळवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत धंगेकर चर्चा करणार आहेत. धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हती. मुंबई किंवा पुण्यात होणाऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर शिवसेनेत प्रवेश कारणाची शक्यता, विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.