अंतर्गत वादात काँग्रेस सत्ता गमावणार? तुम्ही खासदार आहात, मालक समजू नका

Wadettiwar vs Dhanorkar: चंद्रपूरमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ आली आहे. मात्र स्थानिक नेत्यांच्या भांडणामुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गमावण्याची वेळ आली आहे. काँग्रेसच्या आमदार आणि खासदारामध्ये चांगलीच जुंपली आहे.
Senior Congress leaders Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar amid growing political tension in Chandrapur.
Senior Congress leaders Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar amid growing political tension in Chandrapur.Saam Tv
Published On

चंद्रपुरमध्ये नगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेसने महापालिका निवडणुकीतही मुसंडी मारली आहे. मनपावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी अवघ्या चार जागांची गरज असतानाच पक्षातल्या अंतर्गंत वादामुळे मिठाचा खडा पडला आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार विरुद्ध खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद पेटलाय.. वडेट्टीवारांनी नगरसेवक उचलून नेले या धानोरकांरच्या जाहीर आरोपांवर खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक होत नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय.

एकूण 66 जागांपैकी भाजपनं 23, काँग्रेस 27, ठाकरे सेना 6, वंचित बहुजन आघाडीने 1 जागा जिंकली आहे. ठाकरे सेना आणि वंचितची युती आहे. तर काँग्रेससोबत युतीत असलेल्या जनविकास सेना (शेकाप) ने तिन्ही जागांवर विजय मिळवल्याने काँग्रेस आघाडीची संख्या 30 वर पोहोचली आहे.

ठाकरे सेनेने महापौरपदाची मागणी करुन कोणालाही पाठींबा देण्याचं जाहीर केलंय. खरतर धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातला वाद लोकसभा निवडणुकीतही समोर आला होता. वडेट्टीवारांची कन्या युवक काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार लोकसभेसाठी इच्छुक होत्या. त्यावरुन नाराजी नाट्य समोर आलं होतं. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील 10 पैकी सात ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवलाय. भाजपसाठी पर्यायाने माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आता मनपा निवडणुकीतही यश मिळालेलं असताना ते काँग्रेसला पचवता येत नाही अशी स्थिती आहे. आता पक्षश्रेष्ठी दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणणार का? की स्थानिक नेत्यांच्या भांडणात हातातोंडाशी आलेला घास काँग्रेस गमावणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com