Coastal Road -Worli Sea Link : मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्रेला १२ मिनीटात पोहोचता येणार; कसं ते जाणून घ्या?

Coastal Road -Worli Sea Link Update : मुंबईचा कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सील लिंक उद्या शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी गर्डरने जोडले जाणार आहेत. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा आणि १३६ मीटर लांबीचा महाकाय गर्डरने जोडला जाणार आहे.
Coastal Road -Worli Sea Link
Coastal Road -Worli Sea LinkSaam Digital

मुंबईचा कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सील लिंक उद्या शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी गर्डरने जोडले जाणार आहेत. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा आणि १३६ मीटर लांबीचा महाकाय गर्डरने जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे लवकरच वाहचालकांना मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत जाता येणार आहे. यामध्ये मरीन ड्राइव्ह ते वांद्रे या ठिकाणी रस्ते मार्गाने जाण्यासाठी पाऊण तासाऐवजी केवळ बारा मिनीटांत पोहचता येणार आहे. त्यामुळ पूर्व उपनगराला दिलासा मिळणार आहे.

कोस्टल रोडचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून अंतीम टप्प्यात काम आले आहे. या प्रकल्पात प्रिंन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे वरळी सी लिंक जोडला जाणार आहे. या प्रकल्पातील टप्पा असलेल्या १३६ मीटरच्या सर्वात मोठ्या बो स्ट्रिंग आर्च गर्डरची बांधणी रायगड जिल्ह्यातील न्हावा येथे करण्यात आली आहे. न्हावा जेट्टीवरून हा गर्डर बार्जमध्ये टाकून वरळीत येथे आणला गेला आहे. शुक्रवारी हा दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय गर्डर जोडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता वेगवान होणार आहे.

वेळ आणि इंधनाची बचत होणार

कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे गर्डर जोडला जाणार असल्याने लवकरच वांद्र्याहून दक्षिण मुंबईत प्रवास करता येणार आहे. यामुळे येथील रोजची होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सी लिंकपर्यंत सिग्नलमुक्त, करमुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे.

Coastal Road -Worli Sea Link
Indian Railway : वंदे भारत, तेजस एक्सप्रेस पावसाळ्यात रद्द? बुकिंग पोर्टलवर १० जूनपासून गाडी रद्द असा संदेश

पहाटे चार वाजता गर्डर बसविणार

अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन हा गर्डर शुक्रवारी पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळेत हा गर्डर बसवण्यात येणार आहे. वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी पिलर ७ व पिलर ९ च्या मध्ये हा गर्डर बसवण्यात येणार आहे. हा गर्डर बसवणे १०० वर्षांची गॅरंटी असणार आहे. गर्डरला जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग करण्यात आले आहे. पुढील २५ ते ३० वर्षें गंज पकडणार नाही. तसेच तो पुढील १०० वर्षें टिकेल, इतका मजबूत असणार आहे.

Coastal Road -Worli Sea Link
Mumbai News : ३,००० हून अधिक कुटुंबांवर भीषण पाणी टंचाईचं संकट; ग्रामस्थांनी दिला नो वॉटर नो व्होटचा नारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com