Mumbai News : ३,००० हून अधिक कुटुंबांवर भीषण पाणी टंचाईचं संकट; ग्रामस्थांनी दिला नो वॉटर नो व्होटचा नारा

Mumbai Water Problem : मुंबई महानगर पालिकेच्या बोरिवली खाडीपलिकडे असंलेल्या गोराई गावात गेल्या काही वर्षापासून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या गावात राहणाऱ्या ३,००० हून अधिक कुटुंबांना भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.
Mumbai News
Mumbai News Saam Digital

संजय गडदे

मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली खाडीपलिकडे असंलेल्या गोराई गावात गेल्या काही वर्षापासून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या गावात राहणाऱ्या ३,००० हून अधिक कुटुंबांना भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे गोराई गावातील शेकडो कुटुंबीयांनी राजकीय नेत्यांना गोराई गावात प्रचार करण्यापासून रोखण्याचा निर्धार केला आहे. तसंच मतदानावर बहिष्कार देखील टाकण्याची भूमिका घेतली आहे.

महापालिका आणि मुख्यमंत्र्यांकडे याविषयी तगादा लावूनही अध्याप पाणी प्रश्न सुटलेला नाही. गोराई गावाशेजारील मनोरी गावात पालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीतपणे होतो मात्र मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडण्या करण्यात आल्यामुळे मनोरीच्या पुढे असलेल्या गोराईला मात्र पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.

Mumbai News
Varsha Gaikwad: मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीचा तिढा सुटला; वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

यावर तोडगा म्हणून गावकरी टँकरचा सहारा घेत असून काही जण गावातील जुन्या विहिरीतील अशुद्ध पाणी वापरत आहेत. त्यामुळे गोराईकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत त्यांनी नो वॉटर नो व्होटचा नारा दिला आहे. या गावात मत मागण्यासाठी येणारा नेतांना पहिला पाणी द्या नंतर वोट घ्या असा नारा गोराई गावातला नागरिकांनी केली आहे.

Mumbai News
Maharashtra Politics 2024 : खते, शेती उपकरणांवरील GST माफ करणार; ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com