Samruddhi Mahamarg : CM शिंदेंनी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत दिली महत्वाची अपडेट; नागरिकांना होणार आणखी फायदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On

जयश्री मोरे

Eknath shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. 'नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (नाशिक) या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 26 मे रोजी लोकार्पण होत आहे. या टप्प्याचा नागरिकांना आणखी फायदा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Latest Marathi News)

मुंबईमधील वार्ड क्रमांक 121 मधील नगरसेविका चंद्रावती मोरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह सातशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

Samruddhi Mahamarg
Temple Digital Mapping: 'गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करावे', मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'समृद्धी महामार्गावरचा दुसरा टप्पा 80 किलोमीटरचा असून त्याचं लोकार्पण येत्या 26 मे रोजी होत आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल. या महामार्गाचा त्यांना फायदा होईल'.

नगरसेविका चंद्रावती मोरे यांच्या पक्षप्रवेशावरही त्यांनी भाष्य केलं. 'सरकारचं गेल्या दहा महिन्यात झालेल्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला आहे. सरकारतर्फे होणारी कामे बघून त्यांचा एक विश्वास निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे.

यूपीएससी परीक्षेत राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं. त्या विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. ठाण्याच्या कश्मिरा संख्येवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. 'खरं म्हणजे हा ठाण्याचा अभिमान आहे. महाराष्ट्रातून पहिली यूपीएससीमध्ये येणारी कश्मीरा संख्येचं मी मनापासून स्वागत व अभिनंदन केलेला आहे, असे ते म्हणाले.

Samruddhi Mahamarg
Manohar Joshi Health Update: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या प्रकृतीबाबत हिंदुजा रुग्णालयातून आली महत्वाची अपडेट

तर मनोहर जोशी यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'मी आज त्यांच्या मुलाशी बोललो. उमेशजी आणि त्यांच्यावर जे उपचार करताय, त्या डॉक्टरांशी बोललो. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधार होईल अशी ही अपेक्षा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com