Eknath Shinde News: स्वच्छता अभियान मर्यादित न राहता लोकचळवळ बनावी : CM एकनाथ शिंदेंचं आवाहन

Eknath Shinde News: सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे. मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSaam tv
Published On

हिरा ढाकणे, ठाणे

CM eknath Shinde News :

सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे. मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे केले. (Latest Marathi News)

राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या साफसफाईची सुरूवात आज शनिवारी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन कौपिनेश्वर मंदिर परिसरात झाडलोट केली. त्यानंतर मंदिराचा मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याने साफसफाई केली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Shinde News
Mumbai- Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास होणार सुरक्षित, कसा ते वाचा...

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, 'मुंबई- ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे या शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे'.

Eknath Shinde News
Sharad Pawar Watch Satyashodhak Movie: शरद पवार यांनी सपत्नीक पाहिला ‘सत्यशोधक’ चित्रपट; सरकारकडे केली मोठी मागणी

'मुंबई- ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून हे अभियान मर्यादित स्वरूपाचे न राहता त्याचे रूपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहे, यासाठी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com