जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टीनंतर आमदार बांगर यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन; CM शिंदे म्हणाले...

आमदार संतोष बांगर यांची जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे
santosh bangar and eknath Shinde
santosh bangar and eknath Shinde saam tv

मुंबई : बंडखोर आमदार संतोष बांगर (santosh Bangar) यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टी करण्यात आली. सदर वृत्त शिवसेनेच्या मुखपत्रात छापून आलं होतं. त्या वृत्ताला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला होता. जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टी झाल्यानं बांगर यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. बांगर यांची हकालपट्टी झाल्याने त्यांनी मला जिल्हाध्यक्षापदावरून कोणी हटवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. याच हकालपट्टीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. (Eknath Shinde News In Marathi )

santosh bangar and eknath Shinde
'आमदारकी, मंत्रीपद मिळत नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'

बांगर यांच्या हकालपट्टीनंतर संतोष बांगर चांगलेच संतापले आहे. हकालपट्टीनंतर बांगर कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल झाल्यावर बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन शक्तिप्रदर्शन केलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'संतोष बांगर आणि सर्व पदाधिकारी इथे आले आहे. त्यांची शक्ती किती आहे, त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांची विकासकामे प्रश्न असतील त्यांना आम्ही मदत करू. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गट आहे. ज्यांना हिंदुत्वाची भूमिका पटत आहे, ते सोबत येत आहे. विकास कामं राज्य सरकार कुठेही प्रलंबित ठेवणार नाहीत. सेना आणि भाजप युतीचं सरकार विकास कामं करतील. माझ्या संपर्कात ज्यांना आमचे विचार पटलेले आहेत, त्यांना आमच्या सोबत काम करायचं आहे'.

santosh bangar and eknath Shinde
Uddhav Thackeray : पुन्हा एकदा लढायचं आहे; उद्धव ठाकरेंचा 'एकला चलो रे'चा नारा

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर झालेल्या सुनावणीवर देखील भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आमची पहिल्यापासून भूमिका आहे की, ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसी आरक्षणावरून तुषार मेहता यांची भेट आम्ही दिल्लीत घेतली होती. मंगळवारी पुन्हा सुनावणी आहे. आमचा शासनावर पूर्ण विश्वास आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com