Ashadhi Wari 2023: मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांसाठी विमा संरक्षणाची घोषणा; वारीदरम्यान मृत्यू झाल्यास किती भरपाई मिळणार?

Ashadhi Wari 2023: पंढरपूरच्या आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023Saaam tv
Published On

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे लाखो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. (Maharashtra Latest News)

Ashadhi Wari 2023
Raj Thackeray News : राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना थेट आदेश; म्हणाले, आगामी निवडणुकीत...

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.

अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

Ashadhi Wari 2023
Pankaja Munde News: पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं चाललंय काय? सूचक विधानानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com