MLA Disqualification: आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी सीएम आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक; चर्चांना उधाण

CM-DCM Meeting : विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने विरोधकांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली होती. विरोधकांच्या टीकेनंतर नार्वेकरांनी भेटीचे खुलासे केलेत. या भेटीच्या चर्चा संपत नाही तोच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक झाली. ही बैठक का झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
CM-DCM Meeting
CM-DCM Meeting Saam Tv
Published On

(सचिन गाड)

Chief Minister Shinde And Ajit Pawar, Fadnavis Meeting :

उद्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष देणार आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. आमदार अपात्रेच्या निकालाआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झालीय. अद्याप या भेटीचं कारण कळू शकलेले नाही. परंतु निकालानंतरच्या प्लान बी काय असेल यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest News)

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेवर निकाल देणार आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने विरोधकांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली होती. विरोधकांच्या टीकेनंतर नार्वेकरांनी भेटीचे खुलासे केलेत. या भेटीच्या चर्चा संपत नाही तोच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक झाली. ही बैठक का झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजकीय जाणकारांच्या मते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक, ही उद्या लागणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर झालीय. शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्याआधी वर्षा बंगल्यावर तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर देखील उपस्थित होते. दरम्यान, बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतली अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट झाली होती. या दोन्ही नेत्यांची बैठक झाल्यानंतर हे दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले.

CM-DCM Meeting
Rashmi Shukla: पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारताच रश्मी शुक्ला अ‍ॅक्शन मोडवर; सायबर क्राईमवर ठेवणार लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com