Dadar Railway Station : नामांतरावरुन राजकारण पेटलं! दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करा; रिपाईची मागणी

दादर रेल्वेस्थानकाचंही नाव बदलून चैत्यभूमी करा, अशी मागणी रिपाईकडून करण्यात आली आहे.
Dadar Railway Station News
Dadar Railway Station NewsSaam TV
Published On

Dadar Railway Station Renaming : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवलं जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच, औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराप्रमाणेच दादर रेल्वेस्थानकाचंही नाव बदलून चैत्यभूमी करा, अशी मागणी रिपाईकडून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Dadar Railway Station News
Aurangabad Renaming : फक्त शहराचं नाव बदललं की संपूर्ण जिल्ह्याचं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी ही मागणी केली आहे. दादर रेल्वे स्थानकाचं (Dadar Railway Station) नाव चैत्यभूमी असं करा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या मागणीची अद्याप दखल घेण्यात आली नाही. काही वर्षांपूर्वी भीम आर्मीने सुद्धा दादरचे प्रतिकात्मक नामांतर करून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पत्र व्यवहारदेखील केला होता.

सचिन खरात काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून काही जिल्ह्याची नावे बदलण्यात आली आहे. तसेच शिंदे गटाने चर्चगेट रेल्वेस्थानकाचे नाव सुद्धा बदलण्यात यावे, असा ठराव पास केला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये गेले कित्येक वर्षे आंबेडकरी समाज दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी रेल्वे स्थानक करण्यात यावे अशी मागणी करत आहे. ही मागणी अजूनही मान्य झाली नाही, अशी खंत सचिन खरात यांनी व्यक्त केली.

Dadar Railway Station News
Breaking News : औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता 'या' शहराचं नामांतर होणार? भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य

संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आणि निवासस्थान याच परिसरात आहे तसेच महापरिनिर्वाण भूमी सुद्धा याच परिसरामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष मागणी करत आहे की तात्काळ दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी रेल्वे स्थानक करण्यात यावे, अशी मागणी सचिन खरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ करा!

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिवनंतर आता अहमदनगरच्या नामकरण करण्यासाठी भाजप गोटात सुरू हालचाली सुरू झाल्या आहेत. अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली होणार, असं ट्विट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. पडळकर यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

'औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे (Ahmednagar) नामांतर ‘अहिल्यानगर’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com