Breaking News : औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता 'या' शहराचं नामांतर होणार? भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य

अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे.
Bjp Flag
Bjp Flag saam tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवलं जाणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिवनंतर आता अहमदनगरच्या नामकरण करण्यासाठी भाजप गोटात सुरू हालचाली सुरू झाल्या आहेत. अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली होणार, असं ट्विट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. पडळकर यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Bjp Flag
Sanjay Raut News : अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? संजय राऊत म्हणाले....

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे (Ahmednagar) नामांतर ‘अहिल्यानगर’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असे ट्विट पडळकर यांनी केलंय

Bjp Flag
Ravindra Dhangekar : पुण्यात मतांसाठी पैसे वाटप...; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप, थेट उपोषणालाच बसले

दरम्यान, पडळकर यांनी याआधी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर' करा, अशी मागणी केली होती. त्यांनी पत्र लिहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

अहमदनगरचं 'अहिल्यानगर' नाव करण्यामागं काय आहे कारण?

पडळकर यांनी तेव्हा पत्रात लिहून मागणी केली होती की, 'जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com