राऊतांची किंमत सव्वा रुपया नाही, मानहानीची रक्कम वाढवावी - चंद्रकांत पाटील

ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा अशी बोचरी टीका संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती.
राऊतांची किंमत सव्वा रुपया नाही, मानहानीची रक्कम वाढवावी - चंद्रकांत पाटील
राऊतांची किंमत सव्वा रुपया नाही, मानहानीची रक्कम वाढवावी - चंद्रकांत पाटीलSaam Tv News
Published On

कोणी शंभर कोटी, कोणी दोनशे कोटीचा मानहानीचा दावा करतं पण संजय राऊत सव्वा रुपयांचा करणार आहेत, पण माझे मित्र म्हणून मी त्यांना सव्वा रुपयाची किंमत वाढवण्याचा सल्ला देईल, मी चिमटा काढतो जखम करत नाही. अशा खोचक शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (ChandraKant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) पलटवार केला आहे. तसेच, त्यांनी दावा कितीचा ठोकायचा हे अनिल देशमुख, हसन मुश्रीफ यांच्याकडून काहीतरी शिकावं, असा टोलांही पाटलांनी लगावला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुन्हा एकदा पाटलांनी राऊतांवर पटलवार केला आहे.(chandrakant patil gives advice to sanjay raut about increase the defamation case amount)

हे देखील पहा -

संजय राऊतांनी काय वक्तव्य केलं होतं?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर होणाऱ्या आरोपांचे खंडण करत हे सगळे आरोप खोटे असून आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. यावर पुढे ते म्हणाले की, इतरांप्रमाणे १०० कोटी, ५० कोटी असा दावा न लावता सव्वा रुपयांचा दावा लावू, त्यांची (चंद्रकांत पाटील) तेवढीच ताकद आहे. त्यांच्याकडे तेवढेच आहेत, ते सव्वा रुपयावाले आहेत. ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा अशी बोचरी टीका संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती.

चंद्रकांत पाटलांच प्रत्युत्तर

सव्वा रुपयाच्या मानहानीच्या दाव्याबाबत विचारलं असता पाटील म्हणाले की, हरकत नाही, कुणी १०० कोटी, कुणी १५० कोटी..यांनी सव्व रुपया, फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवेल की थोडी किंमत वाढवावी लागेल. कारण, मानहानीचा दावा म्हणजे काय तर माझी मानहानी झाली, ती मानहानी एवढ्या कोटींची होती. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नाहीय, त्यामुळे त्यांनी सव्वा रुपयांऐवजी ही अमाऊंट थोडी वाढवायला हवी. ते माझे मित्र आहे. हिंदु संस्कृतीमध्ये एकमेकांना चिमटा जरी काढला तरी कुणाला जखम होता कामा नये, मी चिमटा काढतो पण कुणाला जखम होऊ देत नाही. राऊतांना दररोज काहीतरी बोलण्यासाठी अवॉर्ड मिळायला हवा अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

राऊतांची किंमत सव्वा रुपया नाही, मानहानीची रक्कम वाढवावी - चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री हतबल आहेत की त्यांनी प्रस्थापितांच्या पुढे... - आ. पडळकर (पहा व्हिडिओ)

कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा सीटसाठी पोटनिवडणुक होणार आहे. भाजपच्या वतीने आज या जागेसाठी संजय उपाध्याय यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com