
मध्य रेल्वे
प्रसिद्धी पत्रक
मेगा ब्लॉक - मागचं वास्तव
प्रस्तावना
मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत-खोपोली व कसारा या मुख्य मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बांद्रा हार्बर मार्गावर, ठाणे ते पनवेल/वाशी ट्रान्सहार्बर मार्गावर तसेच नेरुळ/बेलापूर ते उरण पोर्ट मार्गावर पसरलेली आहे. या ३२५ किमी लांब उपनगरीय नेटवर्कवर दररोज १८१० उपनगरीय ट्रेन चालवल्या जातात. याशिवाय मुख्य मार्गावर दररोज २१० पेक्षा अधिक मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनही चालतात.
उपनगरीय सेवेतील शेवटची गाडी ०२.३० वाजता आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचते तेव्हा पहिली ट्रेन ०२.०६ वाजता सुटलेली असते, म्हणजेच ही सेवा जवळजवळ २४ तास चालू असते. दररोज ४० लाखांहून अधिक प्रवासी या गाड्यांतून प्रवास करतात आणि त्यांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळतो.
मेगा ब्लॉक म्हणजे काय?
अशा मोठ्या प्रमाणावर रेल्वे सेवा चालवताना पायाभूत सुविधांवर मोठा ताण येतो, त्यामुळे विविध उपकरणे झिजतात आणि त्यांची झीज वेळोवेळी भरून काढावी लागते. यामध्ये रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड उपकरणं, विजेच्या तारा व जोडणी साहित्य(फिटिंग्ज), ट्रॅकची जोडणी इ. बाबींचा समावेश होतो. रेल्वेची कार्यक्षमता व सुरळीत सेवा सुनिश्चित करण्यासाठी या सर्व यंत्रणांची नियमित देखभाल करणे आवश्यक असते.
मेगा ब्लॉकचं नियोजन कसं केलं जातं?
मेगा ब्लॉकचं नियोजन सर्वप्रथम अशा महत्त्वपूर्ण देखभाल किंवा बदलाच्या कामांपासून सुरू होतं, जी कामं ट्रॅक पूर्णपणे बंद केल्याशिवाय करता येत नाहीत आणि जी गाड्या सुरू असताना शक्यच नसतात.
मालमत्तेच्या स्थितीचे निरीक्षण, बिघाडांचे विश्लेषण आणि प्रकल्पांच्या वेळापत्रकाच्या आधारे कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार केली जाते.
यानंतर अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार, विद्युत आणि इतर संबंधित विभागांशी संयुक्त समन्वय व नियोजन बैठक घेतली जाते, जेणेकरून देखभालीसाठी एकत्रित प्रयत्न सुनिश्चित होतील.
प्रत्येक विभागासाठी सविस्तर कामाच्या यादी (Job Charts) तयार केल्या जातात, ज्यामध्ये खालील तपशील असतो:
* कामाचं ठिकाण आणि कामाचं स्वरूप
* यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची तैनाती योजना
* सुरक्षा उपाययोजना व विद्युत/सिग्नल यंत्रणांच्या तोडणी आणि जोडणीसंबंधी नियम
* ब्लॉकपूर्व चाचण्या आणि ब्लॉकनंतरच्या कार्यान्वयनाच्या रणनीती हे सर्व प्रस्ताव विभागीय नियंत्रण कार्यालयात एकत्र करून संपूर्ण वाहतूक ब्लॉक योजनेत समाविष्ट केले जातात. जेव्हा आवश्यक साहित्य उपलब्ध असेल, कुशल मनुष्यबळ सज्ज असून कामाच्या ठिकाणचे सर्व अडथळे दूर केलेले असतात तेव्हाच प्रत्यक्ष मेगा ब्लॉक घेतला जातो.
संपूर्ण कामकाज योग्य सुरक्षा उपाययोजनांखाली केले जाते. यामध्ये कॉशन ऑर्डर घेणे, संरक्षण फलक लावणे, तसेच गाडी येत असल्याची सूचना देण्यासाठी हूटरचा वापर केला जातो, जेणेकरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतर्क करता येईल.
कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स परिधान केली जातात, ज्यामुळे कमी प्रकाशातही कामगार सहज दिसू शकतात. याशिवाय बॅनर झेंडे, लाल व हिरवे झेंडे, डेटोनेटर, तसेच सुरक्षेसाठी हातमोजे, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, मोल्ड शूज यांसारख्या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर केला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.