मुंबई-पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वेत मोठा बदल, राज्यातील एक्सप्रेस ट्रेन LHB डब्यांनी धावणार

Mumbai–Pune Train Update: मध्य रेल्वेने मुंबई-पुणे, चेन्नई, गुजरात मार्गावरील १६ एक्सप्रेस गाड्यांमध्ये जुन्या बोगींच्या जागी आधुनिक LHB डबे कायमस्वरूपी बसवले आहेत. प्रवाशांना अधिक आराम, वेगवान प्रवास आणि सुरक्षेच्या सुविधा मिळणार आहेत.
trains
trains saam tv
Published On
Summary
  • मध्य रेल्वेने राज्यातील १६ एक्सप्रेस गाड्यांमध्ये जुन्या बोगीऐवजी आधुनिक LHB डबे बसवण्याचा निर्णय घेतला.

  • LHB कोचेस १६० किमी प्रतितास वेगाने धावू शकतात आणि भविष्यात २०० किमी वेग शक्य.

  • प्रवाशांसाठी LED लाइटिंग, चार्जिंग सॉकेट, डिस्क ब्रेक्स आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध.

  • सीएसएमटी-चेन्नई, पुणे-अहमदाबाद, पुणे-भुज यांसह अनेक प्रमुख गाड्यांचा यात समावेश.

List of express trains upgraded with LHB coaches in Maharashtra : मुंबई आणि पुण्याहून चेन्नई, गुजरातमध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मध्य रेल्वेने मोठा बदल केला आहे. राज्यातील १६ रेल्वेमध्ये आता जुन्या बोगीच्या जागी एलएचबी डबे बसवण्यात आलेत. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात त्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. LHB कोच (लिंके हॉफमॅन बुश) हे जर्मनीमध्ये डिझाइन केलेले असून त्याची निर्मिती भारतात होत आहे. LHB कोचेस हे आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आले आहे. यामध्ये अँटी-क्लाइंबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्य यासारख्या अत्याधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील १६ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पारंपारिक डब्यांच्या जागी कायमस्वरूपी LHB बोगी बसवण्यात येणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस, पुणे - वेरावल एक्सप्रेस, पुणे - भुज एक्सप्रेस, पुणे - अहमदाबाद एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. LHB बोगी बसवल्यास ट्रेनचा स्पीड आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या असणाऱ्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत LHB डब्यांचा वेग जास्त आहे. आयसीएफ डब्यांचा वेग १४० KM प्रतितास इतका आहे. तर LHB डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास आहे. हा वेग भविष्यात २०० किमीपर्यंत वाढवता येणार आहे.

trains
मक्काहून येताना मध्यरात्री काळाचा घाला, ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, आगीचा भयानक व्हिडिओ

LHB कोचमुळे प्रवाशांना चांगला आराम मिळेल. बोगीमध्ये एलईडी लाइटिंग, ५-पिन चार्जिंग सॉकेट्स आणि कार्यक्षम ब्रेकिंगसाठी डिस्क ब्रेक्स यासारखे अनेक फायदे असतील. बोगीमध्ये आपतकालीन स्थितीत बाहेर निघण्यासाठी पाच ते सहा खिडक्या असतील. त्याशिवाय ६ तासांच्या बॅकअपसह आपत्कालीन प्रकाश युनिट (ELU) देखील देण्यात आलेय.

trains
Delhi Blast Update : बहि‍णीकडे जातो म्हणून निघाला अन् दिल्लीत पोहचला, बॉम्बस्फोटावेळी मशिदीत मुक्काम, अकोल्यात येताच....

कोणत्या एक्सप्रेसमध्ये LHB कोच -

सीएसएमटी-चेन्नई

पुणे-भगत की कोठी एक्सप्रेस

पुणे-अहमदाबाद

कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन

हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेस

अहमदाबाद - पुणे एक्सप्रेस

भगत की कोठी - पुणे एक्सप्रेस

चेन्नई - सीएसएमटी एक्सप्रेस

कोल्हापूर - अहमदाबाद एक्सप्रेस

वेरावळ - पुणे एक्सप्रेस

कोल्हापूर - नागपूर एक्सप्रेस

भुज - पुणे एक्सप्रेस

पुणे - भूज एक्सप्रेस

नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस

अहमदाबाद - कोल्हापूर एक्सप्रेस

पुणे - वेरावल एक्सप्रेस

trains
Local Body Election : अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का, गोगावलेंनी रायगडचे राजकारण फिरवले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com