Mumbai Local : लोकलच्या गर्दीतून मुंबईकरांची होणार सुटका; हेडवे टायमिंग होणार कमी, खुद्द रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

Mumbai Local Trains : कम्युनिकेशन-आधारित ट्रेन कंट्रोल (CBTC) एम्बेडेड कवच प्रणाली लोकल यंत्रणेत बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ट्रेनमधील हेडवे टायमिंग कमी होणार, त्यामुळे दुप्पट सेवा देता येईल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
Mumbai Local
Mumbai LocalSaam Digital
Published On

लोकल, मुंबईची लोकल म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ती तुफान गर्दी आणि या गर्दीतून वाट काढणारे मुंबईकर. गजबजलेल्या या शहरात लोकलने कामावर जाणे आणि कामावरून घरी येणे हा बहुतेक मुंबईकरांचा नित्याचाच प्रवास...ही व्यवस्था कोलमडली की अख्ख शहर थांबल्यासारखं वाटतं... लोकलशिवाय मुंबईकरांना पर्याय नसला तरी अलीकडे या गर्दीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र खुद्द रेल्वेमंत्र्यांनी आता मुंबईची गर्दी लवकरच कमी होईल असं म्हटलं आहे. कसं ते पाहूया...

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेत लवकरच एक मोठी क्रांती घडणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवास सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कम्युनिकेशन-आधारित ट्रेन कंट्रोल (CBTC) एम्बेडेड कवच प्रणाली लोकल यंत्रणेत बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अशी यंत्रणा असणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर ठरणार आहे. ही यंत्रणा केवळ मुंबईची उपनगरी व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित करणार नाही तर रेल्वे सेवांमधील प्रवासाचा मार्ग मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि दुप्पट लोकल उपलब्ध होतील. त्यामुळे गर्दीपासून मुंबईकरांना काहीसा दिला मिळणार आहे. येत्या तीन वर्षात कवच आणि CBTC सिस्टमचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

भारतीय रेल्वे काही काळापासून कवच सुरक्षा उपकरणावर काम करत आहे. विविध आवृत्त्या जारी करताना चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि आता कवच-4 च्या आवृत्तीसह सर्वोच्च सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल (SIL)-4 प्राप्त झाली आहे, जी लवकरच वापरा आणली जाईल,”
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

काय आहे कवच आणि CBTC तंत्रज्ञान?

कवच ही संपूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेली एक स्वदेशी टक्कर-प्रतिबंधक प्रणाली आहे. ही प्रणाली ट्रेनच्या मार्गावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी बनवली गेली आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होतो. दुसरीकडे, CBTC हे तंत्रज्ञान ट्रेन दरम्यानचे अंतर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे ट्रेन सेवांचा वेळ अधिक कमी होतो.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीमध्ये, कवच आणि CBTC या दोन्ही तंत्रज्ञानांच्या एकत्रीकरणामुळे एक क्रांतिकारी बदल घडून येणार आहेत. CBTC तंत्रज्ञान मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) फेज 3A चा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्याचा उद्देश मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट आणि सुरक्षित करणे आहे. मुंबई रेल विकास महामंडळाद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Mumbai Local
Port Blair : चोळ साम्राज्याचा नौदल तळ ते श्री विजयपुरम; पोर्ट ब्लेअरचा रंजक इतिहास, सुभाषचंद्र बोस यांच्याशी काय आहे संबंध?

हेडवे टायमिंग १८० सेकंदावरून १५० वर?

ट्रेन दरम्यानचे अंतर कमी होईल: CBTC तंत्रज्ञानाच्या मदतीने दोन ट्रेन दरम्यानचे अंतर मोठ्या प्रमाणात कमी केले जाईल. सध्या ट्रेन सेवा दरम्यान साधारणत: 180 सेकंदांचा गॅप असतो. मात्र, या नव्या तंत्रज्ञानामुळे हेडवे वेळ कमी होऊन 150 सेकंदावर आणला जाईल. ज्यामुळे एका वेळेस अधिक ट्रेन चालवल्या जाऊ शकतील.

सेवा दुप्पट होईल: हेडवे वेळ कमी केल्यामुळे अधिक ट्रेन एका वेळेस चालवल्या जाऊ शकतील. यामुळे उपनगरीय रेल्वे प्रणालीची सेवा दुप्पट करण्याची शक्यता आहे. सध्या, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे - मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 319 किलोमीटरचा विस्तार आहे, ज्यावर सुमारे 3,000 पेक्षा जास्त सेवा दररोज चालवल्या जातात. या नव्या तंत्रज्ञानामुळे ही संख्या आणखी वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

सुरक्षेत वाढ होईल: कवच प्रणालीची प्राथमिकता सुरक्षा वाढवणे आहे. ही प्रणाली दोन ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी आणि ट्रेन्सना वेळेत थांबवण्यास किंवा गती कमी करण्यास मदत करते. त्याचसोबत सर्वोच्च सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल (SIL-4) प्राप्त केल्यामुळे या तंत्रज्ञानाची विश्वासार्हता आणि क्षमता अधिक असणार आहे.

Mumbai Local
Vande Bharat Sleeper Express : महाराष्ट्रात ३ मार्गावर धावणार स्लिपर वंदे भारत एक्स्प्रेस? मुंबईतून दिल्लीही अवघ्या काही तासांवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com