Port Blair : चोळ साम्राज्याचा नौदल तळ ते श्री विजयपुरम; पोर्ट ब्लेअरचा रंजक इतिहास, सुभाषचंद्र बोस यांच्याशी काय आहे संबंध?

Port Blair Special Story : अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आता श्री विजयपुरम म्हणून ओळखली जाणार आहे. चोळ साम्राज्यापासून ते ब्रिटीश वसाहतवादापर्यंत या बेटाचा रंजक असा इतिहास आहे.
Port Blair
Port Blair Saam Digital
Published On

पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटांची ही राजधानी आता श्री विजयपुरम म्हणून ओळखली जाणार आहे. या नावातून अंदमान- निकोबार बेटांचा समृद्ध इतिहास आणि शूरवीरांना सन्मान मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हलटं आहे. वसाहतवादातून या अंदमान निकोबारला मुक्ती मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे. पण पोर्ट ब्लेअर हे नावं कसं पडलं? सुभाषचंद्र बोस आणि चोळ साम्राज्याचा यांचा बेटाशी काय संबंध आहे? यावरचा हा रिपोर्ट...

पोर्ट ब्लेयर अंडमान आणि निकोबार द्वीपसमूहाचं प्रवेशद्वार आहे. ब्रिटीश साम्राज्यात अंदमान द्वीपसमूहाचा तपशीलवार सर्व्हे करणारा पहिला अधिकारी नेमण्यात आला होता. त्याचं नाव होतं नौदल सर्वेक्षक आणि लेफ्टनंट आर्चिबल्ड ब्लेअर. बॉम्बे मरीनमध्ये १७७१ मध्ये सामील झाल्यानंतर, ब्लेअर यांनी भारत, इराण आणि अरबी किनाऱ्यांवरील सर्व्हेची जबाबदारी देण्यात आली होती. १७८० च्या दशकात त्यांनी चागोस आर्कीपेलागो, डायमंड हार्बर आणि हुगळी नदीसह अनेक सर्व्हे मोहिमेत भाग घेतला होता.

डिसेंबर १७७८, ब्लेअरने दोन जहाजांसह अंदमानसाठी प्रवास सुरू केला. हा प्रवास एप्रिल १७७९ पर्यंत चालला. ब्लेअर अंदनान निकोबार बेटांच्या पश्चिम किनाऱ्याभोवती फिरून पूर्व किनाऱ्यावर उत्तर दिशेला पोहोचला. इथे पोहोचल्यानंतर त्याने बंदराचं महत्त्व ओखळून तपशीलवार अहवाल तयार केला आणि या बेटाला त्याने पोर्ट कॉर्नवॉलीस असं नाव दिलं (ब्रिटिश भारतीय सेनेचे कमांडर-इन-चीफ, कॉमोडोर विलियम कॉर्नवॉलीस यांच्या सन्मानार्थ). या नैसर्गिक बंदराचा सविस्तर अहवाल सादर करून ईस्ट इंडिया कंपनीला सादर केला. कंपनीने ब्लेअरच्या कामावर खूश होत हा अहवाल स्वीकारला. नंतरच्या काळात या बंदराला ब्लेअरचं नावं देण्यात आलं.

ईस्ट इंडिया कंपनीने या द्वीपसमूहाचा ब्रिटीश वसाहतीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मुख्यतः मलेशियाच्या चोरांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक सुरक्षित बंदर स्थापित करण्यासाठी. द्वीपसमूहाचा उद्देश अपघातग्रस्त लोकांचे आश्रयस्थान आणि इतर शक्तींसोबत संघर्ष असल्यास त्यांच्या अधिकाऱ्यांचे आश्रयस्थान म्हणून केला जात होता. दरम्यान वसाहतीच्या सुरक्षेच्या कारणास्तव डिसेंबर १७९२ मध्ये उत्तर-पूर्व अंदमानच्या नवीन स्थापन करण्यात आलेल्या पोर्ट कॉर्नवॉलीस येथे स्थलांतरित करण्यात आलं. पण नवीन वसाहत फार काळ टिकली नाही कारण गंभीर रोग आणि मृत्यूंच प्रमाण वाढलं झाले आणि १७९६ मध्ये ही वसाहत बंद केली.

१८५७ च्या उठावामुळे ब्रिटिशांनी कैद केलेल्या अनेक भारतीयांना ठेवण्यासाठी कारागृहाची गरज वाटली. त्यामुळे त्यांनी पोर्ट ब्लेयरला एक कारागृह निर्माण करण्यात आलं. बहुतेक कैद्यांना पोर्ट ब्लेयर येथे आजीवन कारावास आणि काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात १९०६ पर्यंत एक विशाल सेल्युलर जेलची स्थापना करण्यात आली. हेच ते कारागृह काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी म्हणून ओळखले जाते. दरम्यान, ब्लेअर १७९५ मध्ये इंग्लंडला परतले होते.

Port Blair
UP Accident : आगरा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, केसर पान मसाला कंपनीच्या मालकाची पत्नी जागीच ठार

चोल सम्राट राजेंद्र I ने 11व्या शतकात अंदमान निकोबारला एक सामरिक नौदल तळ म्हणून वापर केला होता. इथूनच इंडोनेशिया स्थित श्रीविजया साम्राज्यावर आक्रमण केलं होतं. 1050 ईसवीच्या तंजावूर येथील एका शिलालेखानुसार, चोल साम्राज्याच्या काळात या बेटाला "मा-नक्कावारम" (नेकेड लँड) असं नाव देण्यात आलं होतं. त्यावरूनच कदाचित ब्रिटिश काळात "निकोबार" नाव देण्यात आलं असावं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे.

१९४३ मध्ये जपानी सैन्याने अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर ताबा मिळवला त्यावेळी पोर्ट ब्लेअरशी सुभाषचंद्र बोस यांचा संबंध आला. जपानने अंदमानचं सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवले होते. जपानच्या सहयोगाने २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाला 'शहीद' आणि 'स्वराज' अशी नावे दिली आणि या द्वीपसमूहाला भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा भाग म्हणून घोषित केले. नेताजींनी पोर्ट ब्लेअरला 'स्वतंत्र भारतीय प्रदेश' म्हणून घोषित केले आणि तिथे ३० डिसेंबर १९४३ रोजी त्यांनी स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत महत्त्वाची होती कारण त्यात भारतीय स्वातंत्र्याचे पहिले प्रतीकात्मक प्रदर्शन झाले होते.

Port Blair
Vande Bharat Sleeper Express : महाराष्ट्रात ३ मार्गावर धावणार स्लिपर वंदे भारत एक्स्प्रेस? मुंबईतून दिल्लीही अवघ्या काही तासांवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com