Lonavala : आठ बंगला मालकांवर गुन्हा दाखल

काही दिवसांपासून लाेणावळ्यात अप्रिय दुर्घटना घडल्या आहेत.
Crime, Lonavala , Lonavala Gramin Police
Crime, Lonavala , Lonavala Gramin PoliceSaam tv

मावळ : पर्यटनस्थळ (tourism) असलेल्या लोणावळ्यात (lonavala) पाेलिसांची (police) परवानगी न घेता बंगला भाड्याने दिल्याने आत्तापर्यंत एकूण आठ बंगला मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पाेलिसांच्या या कारवाईमुळे लाेणावळ्यातील निवास व्यवस्थेसाठी भाड्याने देण्यात येणा-या बंगला मालकांना कायदाची आठवण हाेऊ लागली आहे. (Lonavala Latest Marathi News)

लोणावळा शहर परिसरात बंगला मालक शनिवार आणि रविवारी या दोन दिवसांकरीता त्यांचा बंगला पर्यटकांना भाड्याने देत असतात. दरम्यान काही दिवसांपुर्वी एका बंगल्यात नाशिक येथील चार वर्षीय मुलगा पाण्यात बूडल्याची घटना घडली होती. तसेच दुसऱ्या घटनेत तेरा वर्षीय मुलाला जलतरण तलाव नजीक इलेक्ट्रिक शॉक लागला होता.

Crime, Lonavala , Lonavala Gramin Police
Breaking News : पंढरपूरात रेल्वेच्या धडकेत दाेघांचा मृत्यू; जखमींना नेलं रुग्णालयात

त्या पार्श्वभूमीवर लाेणावळा ग्रामीण पाेलिसांनी बंगला भाडयाने देऊन गैरवापर करणा-यांवर, विना परवाना बंगला भाड्याने देणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये लोणावळा शहर, गोल्ड व्हॅली, तुंगार्ली, खंडाळा व इतर परिसरात पाेलिसांनी तपासणी केली. त्यानंतर विना परवाना बंगला भाड्याने देणा-या आठ बंगला मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Crime, Lonavala , Lonavala Gramin Police
गणपती मंडळांसाठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा
Crime, Lonavala , Lonavala Gramin Police
Crime News : संत बाळूमामा मंदिरातून लाखाेंचा ऐवज लंपास; चाेरटे सीसीटीव्हीत कैद
Crime, Lonavala , Lonavala Gramin Police
Punam Yadav : पूनम यादवची सुमार कामगिरी, पंचांच्या निर्णयास आव्हान; ज्युरींनी फेटाळली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com