पंढरपूर : पंढरपूर (pandharpur) येथील रेल्वे स्टेशन (railway station) नजीक रेल्वेच्या धडकेत दाेघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य दाेघे जण जखमी (injured) झाले आहेत. ही घटना (Pandharpur Railway Accident News) मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. (Pandharpur Latest Marathi News)
या घटनेत परप्रांतीय मजूर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेतील दाेन्ही जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आज (बुधवार) सकाळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट दिली.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनूसार रेल्वे अपघातात दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. कुर्डुवाडीहून मिरजकडे जाणा-या मालगाडीने रूळावर बसलेल्या चार मजूरांना उडवलं. त्यात दाेघे ठार झाले. तर दोघे जखमी गंभीर जखमी झाले. हे चारही मजूर छत्तीसगड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या चाैघांची ओळख पटविण्याचे काम सध्या रेल्वे पोलीस करीत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.