मुंबई - भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करण्यासह शस्त्रास्त्र कायद्यांच उल्लघंन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर मोहित कंबोज प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी जबरदस्ती त्याच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील पहा -
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजप नेत्याने रस्त्याच्या मधोमध तलवार काढून ती दाखवली, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.