मुंबई: आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात मांडला. हा अर्थसंकल्प राज्याला आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प आहे. हे एक विकासाच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आज राज्याचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
मी ठामपणे सांगतो हा अर्थसंकल्प (Maharashtra Budget)सर्वांचा विकास करणारा अर्थसंकल्प आहे. राज्यातील जनता या अर्थसंकल्पाचे स्वागत करेल, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.
राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget ) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आज सादर केला. अर्थसंकल्पात शेतऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यात शेततळ्याच्या अनुदान 50 टक्क्यांनी वाढ केली आहे.
राज्यात सध्या 270 सिंचन प्रकल्प सुरु आहेत. गेल्या दोन वर्षात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात भर दिला आहे, त्याचे परिणाम दिसत आहे. 2022 हे वर्ष महिला शेतकरी (Farmers) शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Edited by- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.