Breaking : नेपाळच्या गायिकेचा अंबरनाथच्या महिलेला साडे सहा कोटींना गंडा!

अंबरनाथच्या महिलेला किडनीच्या मोबदल्यात चार कोटी देण्याचे आमिष दाखवणाऱ्या नेपाळच्या गायिकेने देशभरात अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे.
Breaking : नेपाळच्या गायिकेचा अंबरनाथच्या महिलेला साडे सहा कोटींना गंडा!
Breaking : नेपाळच्या गायिकेचा अंबरनाथच्या महिलेला साडे सहा कोटींना गंडा!SaamTvNews
Published On

अंबरनाथ : अंबरनाथच्या महिलेला किडनीच्या मोबदल्यात चार कोटी देण्याचे आमिष दाखवणाऱ्या नेपाळच्या गायिकेने देशभरात अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. या गायिकेने देशभरातून फसवणूक करून साडेसहा कोटी रुपये अवैध मार्गाने गोळा केल्याचे उघड झाले ,या गायिकेच्या (Singer) साथीदाराच्या बँक स्टेटमेंटवरून ही बाब उघड झाली असून पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे देखील पहा :

अंबरनाथच्या रहिवासी कल्पना मगर यांची नेपाळची (Nepal) गायिका रविना बाबी यांनी तब्बल आठ लाखांची फसवणूक केली. रविना हिने मगर यांची किडनी चार कोटी रुपयाला विकण्याचे आश्वासन दिले होते. आपल्याला चार कोटी रुपये मिळणार या आशेने मगर भूलथापांना बळी पडल्या नोंदणी आणि इतर कामकाजासाठी रविनाने मगर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने आठ लाख रुपये वसूल केले होते.

Breaking : नेपाळच्या गायिकेचा अंबरनाथच्या महिलेला साडे सहा कोटींना गंडा!
धक्कादायक : चंद्रपुरात विवाहित महिलेवर पोलिसाने केला बलात्कार!

फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात येताच कल्पना मगर यांनी सामाजिक कार्यकत्यांच्या मदतीने थेट दिल्ली गाठत रविना हिचा शोध घेतला. एवढेच नव्हे तर रविनाने ज्या बँक खात्यात पैसे जमा करायला सांगितले होते तो बँक खातेधारक आणि रविनाचा साथीदार अरविंद कुमार याची माहिती काढली. त्यांच्या बँक (Bank) खात्यात देशभरातून साडेसहा कोटी रुपये जमा झाल्याचे उघड झाले आहे. देशभरात फसवणूक झालेल्या अनेकांनी याच बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. एवढी मोठी गंभीर बाब उघड झाल्यानंतरही अंबरनाथच्या पोलिसांनी या मुख्य आरोपींना अद्याप अटक केलेलो नाही.

Breaking : नेपाळच्या गायिकेचा अंबरनाथच्या महिलेला साडे सहा कोटींना गंडा!
आदल्या दिवशी केले लग्न; दुसऱ्या दिवशी प्रेयसी म्हणाली लग्न अमान्य, प्रियकराने केले विषप्राशन!

याबाबत शिवाजी नगर (Shivaji Nagar) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोंगे यांना विचारले असता, पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस एकदा त्या आरोपीस पकडण्यास गेले होते पण ते मिळाले नाही. पुन्हा आमची टीम या आरोपीस शोधण्यास जाणार असल्याचे म्हटले आहे. या आरोपींना मोकाट सोडण्यात आल्याने देशात पुन्हा अनेकांची फसवणूक होण्याचा धोका आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com