Mumbai Pollution: 'प्रदूषणावर उपाययोजना करुन 'मुंबईकरांवर' उपकार करत नाही...' हायकोर्टाने महापालिका अन् राज्य सरकारला झापले

Highcourt On Mumbai Pollution: प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजना योग्य असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers
Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire CrackersHC on Fire Crackers - Saam Tv
Published On

सचिन गाड, प्रतिनिधी

Mumbai Air Pollution:

एकीकडे दिवाळी तोंडावर आली असतानाच राजधानी मुंबईमध्ये प्रदूषणाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबईमधील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषणाचा एक्यआय 300 पेक्षा जास्त झाला आहे. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजधानी मुंबईमधील वाढत्या प्रदूषणावरुन मुंबई हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. यावेळी वायु प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची उच्च न्यायालयात माहिती देण्यात आली.

याचिकेवर बोलताना "हे सगळे उपाय करून तुम्ही मुंबईकरांवर कोणतेही उपकार करत नाही. तुमच्याकडून यापेक्षा बरंच काही अपेक्षित आहे. असे म्हणत खरतर ही वेळ यायलाच नको होती, सर्व यंत्रणांनी यावर आधीच गांभीर्यानं काम करायला हवे होते" असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय म्हणाले. तसेच वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजना योग्य असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers
Jalna News: जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनीही आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले. यामध्ये त्यांनी राज्य सरकार तर्फे हवेचा दर्जा सुधारण्यासाठी निर्धारित गाईड लाईन आणि कोर्टाच्या निर्देशाचे काटेकोरपणाने पालन केले जात असल्याचे सांगितले आहे.

तसेच प्रदूषणावर आणि दिलेल्या निर्देशांवर आम्ही गांभीर्यानं काम सुरू केले आहे. परिस्थिती ही रातोरात सुधारणार नाही पण येत्या काही दिवसांत याचे सराकात्मक परिणाम दिसणार असल्याची ग्वाहीही महाधिवक्ता सराफ यांच्यातर्फे देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Bombay High Court On Mumbai Air Pollution and on Fire Crackers
Nandurbar RTO: आरटीओकडून खाजगी ट्रॅव्हल एजन्सीची तपासणी; जास्तीचे भाडे आकारल्यास कार्यवाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com