Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत

BMC Mayor Election: मुंबई महानगर पालिकेच्या महापौरपदाच्या निवडीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. अजि पवारांची राष्ट्रवादीने शिंदेसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ वाढले.
Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत
Uddhav Thackeray Shivsena Seatback NewsSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिला

  • राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे शिंदे गटात सहभागी झाले

  • उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा मुंबईत मोठा धक्का बसला

  • मुंबई महानगर पालिकेत महायुतीचे संख्याबळ वाढले

गणेश कवडे, मुंबई

मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला. निवडणुकीमध्ये ठाकरेसेनेसोबत असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी आता महायुतीसोबत गेली आहे. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे महायुतीच्या गोटात सामिल झाले आहेत. मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला.

ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं अचानक बाजू बदलली त्यामुळे मुंबईत ठाकरेसेनेला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदेंना पाठींबा देण्याकरता एकत्र आले आहेत. प्रभागातील निधीकरता, विकासाकरता आपण महायुतीसोबत गेले असल्याचे अजित रावराणे यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आपली भूमिका बदलली असल्याची माहिती समोर आली आहे.

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत
BMC Mayor: ठाकरेंचा महापौर होणार? दिग्गज नेत्याची एक 'रिक्वेस्ट' अन् राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार गटाचे अजित रावराणे हे मालाडमधून निवडून आले होते. शरद पवार गटाचे हे मुंबईतील एकमेक नगरसेवक आहेत. त्यांनी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईत महायुतीचे संख्याबळ वाढले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ वाढले आहे. १२२ संख्याबळ महायुतीकडे आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवली होती. पण अजित रावराणे एकटे निवडून आल्यामुळे त्यांनी शिंदेगटाला पाठिंबा दिला.

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत
BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com