BMC Budget : मुंबई स्वच्छ आणि चकाचक ठेवण्यासाठी 5 हजार स्वच्छता दूत नेमणार - इक्बालसिंह चहल

BMC Budget Iqbal Singh Chahal: आयुक्त इक्बालसिंह चहल आज मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 अर्थसंकल्प सादर केला.
BMC Budget Iqbal Singh Chahal
BMC Budget Iqbal Singh Chahalsaam tv

Mumbai News Live Updates: मुंबई स्वच्छ आणि चकाचक ठेवण्यासाठी 31 मार्चपर्यंत 5 हजार स्वच्छता दूतांची नियुक्ती करणार असल्याची माहिती बीएमसीचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. चहल यांनी आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

आयुक्त इक्बालसिंह चहल आज मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्वच मुंबईकरांचे लक्ष लागले होते. अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 50 हजार कोटींहून जास्त तरतूद करण्यात आली आहे.

BMC Budget Iqbal Singh Chahal
Shinde-Fadnavis Government: विधान परिषद निवडणुकांनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये धुसफूस?

मुंबईच्या स्वच्छतेवर भर

मुंबई चकाचक करण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी 31 मार्चपर्यंत 5 हजार स्वच्छता दूतांची नियुक्ती करणार असल्याचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे. विविध वॉर्डमध्ये हे स्वच्छता दूत आपला प्रभाग स्वच्छ ठेवतील असे ते म्हणाले.

कोव्हीड वारीयरना प्राधान्य

कोरोना काळात कोव्हीड वारीयर म्हणून काम केलेल्या 1200 जणांना यात प्राधान्य देणार असल्याची माहिती चहल यांनी दिली. ही नियुक्ती 1 वर्षच्या करारावर नाही तर कायमस्वरूपीसाठी केली जाईल असेही ते म्हणाले. कोरोना काळात या वॉरीयर्सनी केलेल्या कामाचे पालिकेवर उपकार असल्याने ही कायमस्वरूपी नियुक्ती होणार आहे असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पात डझनभर प्रकल्प

यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन प्रकल्प हाती घेतल्याची माहिती चहल यांनी दिली. यात 9 हजार कोटींची वर्सोवा-दहिसर हा कोस्टल रोड, दहिसर-मिररोड 4 हजार कोटी रुपयाची तरतूद, आरोग्यम कुटुंबकम कार्यक्रम घेणार, 249 स्किल सेंटर सुरू करणार, एअर क्वालिटी प्रकल्प यांसह डिजिटल क्लासेसचा प्रकल्प नव्याने हत्ती घेण्यात आला आहे.

BMC Budget Iqbal Singh Chahal
BMC Budget 2023 : काय म्हणाले इक्बाल सिंह चहल ?; वाचा महत्वाचे मुद्दे

पैसे कसे खर्च करणार

या प्रकल्पांवर खर्च करण्यासाठी 11 हजार कोटी जीएसटीमधून मिळणार असल्याचे चहल यांनी सांगितले. तसेच 5 ते 6 कोटी प्रॉपर्टी टॅक्स महापालिकेला मिळणार आहे. याशिवाय इन्फ्रा फड 15 हजार 600 कोटी जमा झाला आहे, अशी माहिती चहल यांनी दिली.

निधीची कमतरता नाही - चहल

ते म्हणाले की, मी 8 मे 2020 ला कमिशनर म्हणून चार्ज घेतला. तेव्हा 77 हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता त्या 88 हजार कोटींच्या झाल्या आहेत. निधीची कमतरता नाही. कोस्टल रोड आणि एसटीपी प्रकल्प आम्ही आमच्याकडे असलेल्या पैशातून करत आहोत. लोकांना कर लावून हे प्रकल्प केले जाणार नाहीत. या सगळ्या प्रकल्पांसाठी इन्फ्रा फंड वापरला जाईल. इतर कामांसाठी ठेवी वापरल्या जातील. ठेवी असताना मुंबईकरांना या प्रकल्पांसाठी कर का लावायचा असेही ते चहल म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com