वसई/विरार: इन्स्टाग्रामवर मॉडेल (Instagram Model) बनू पाहणाऱ्या तरुणींनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी. इन्स्टाग्रामवर तरुणींना मॉडेल बनविण्याच्या भूलथापा देऊन त्यांना ब्लॅकमेल (Blackmail) करणार्या एका तरुणाला वसई पोलिसांनी (Vasai Police) अटक केली आहे. आतापर्यंत त्याने ७ मुलींना अशाप्रकारे जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. (Blackmail to make young girls dream of becoming 'Instagram Model'; Police made filmy style arrests)
हे देखील पहा -
अबू सलीम रेहमान अन्सारी (१९) हा तरुण वसईत (Vasai) राहतो. त्याने मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी एक योजना बनवली. इन्स्टाग्रामवर (Instagram) तो मुलींना प्युमा (Puma) कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून मेसेज करायचा. नव्या चेहर्यांची गरज आहे असे सांगून मॉडेलिंगची (Modeling) ऑफर द्यायचा. प्रसिध्दी आणि पैसा याला भूलून या मुली तयार व्हायच्या. मग या मुलींशी व्हॉटसॲप चॅट (Whatsapp Chat) करायचा. त्यांना अश्लील चॅट (सेक्स चॅट) करण्यास उद्युक्त करायचा आणि त्याचे रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करायचा. पैसे दिले नाहीत तर या अश्लील चित्रफिती वायरल करायच्या धमकी देऊन पैसे आणि एक रात्र सोबत घालविण्याची मागणी करायचा. वसईत राहणार्या २३ वर्षीय तरुणीला त्याने अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले होते. या तरुणीने वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police Station) तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली.
असा रचला सापळा
आरोपी अबू सलीम हा साराह वर्मा (Sarah vermaa) या इन्स्टाग्राम खात्याद्वारे मुलींना संपर्क करायचा आणि मॉडेलिंगची ऑफर द्यायचा. त्यानंतर कंपनीचा अधिकारी हर्ष बनून त्या मुलींशी बोलायचा. त्याचे इंग्रजी चांगले असल्याने त्याच्या बोलण्याला मुली फसायचा. वसई राहणार्या २३ वर्षीय तरुणीला त्याने ५ हजार रुपये घेऊन लॉजवर बोलावले होते. त्यासाठी कॅब बुक केली होती. पोलिसांनी कॅब चालक बनून सापळा लावला आणि गोखिवरे येथून त्याला अटक केली.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.