मंत्रालयात झिंगझिंग झिंगाट सुरु असेल तर मंत्री शुद्धीत कसे असणार - नितेश राणेंचे शरसंधान
पुणे : मंत्रालयात Mantralaya सापडलेल्या दारुच्या रिकाम्या बाटल्यांवरुन Wine Bottles आता राजकारणाला Politics उधाण आले आहे. महाविकास आघाडीवर Maha Vikas Aghadi हल्लाबोल करण्याची संधीच भाजपच्या BJP नेत्यांना सापडली आहे. या प्रकरणावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी Nitesh Rane ट्वीट करुन आघाडी सरकारवर शरसंधान केले आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुखे आचार्य तुषार भोसले यांनीही सरकारवर टीका केली आहे. BJP Mla Nitesh Rane tweets against government
आता कळले.. ठाकरे सरकार मधील काही मंत्री.. गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात.. झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार? असे म्हणत नितेश राणेंनी सरकारवर टीका केली आहे.
दुसरीकडे ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार असे म्हणत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुखे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. "साधु-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे नाव काळ्या अक्षरात लिहीले जाईल.मंत्रालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या आणि मंत्रालयाच्या फाईलींमधे दारूला धार्जिण असलेली धोरणं. या सरकारने मंत्रालयाचं रुपांतर मदिरालयात केल्यामुळे देवालये कशी उघडणार?" असा सवाल भोसले यांनी केला आहे. BJP Mla Nitesh Rane tweets against government
''आज होत असलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक श्रावण महिन्यातील पहिली बैठक आहे. म्हणुन या सरकारकडे आमची मागणी आहे, की किमान आजच्या बैठकीत तरी मदिरेचा विषय बाजूला ठेऊन मंदिरं उघडण्याचा निर्णय घ्यावा," अशी बोचरी टीका भोसले यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
हे देखिल पहा-
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.