
सुशांत सावंत
Ashish Shelar On Rahul Gandhi News : 'राहुल गांधींनी नेहरूंना वाचलं नाही. इंदिरा गांधींचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळमध्ये निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं या पुरताच अभ्यास केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे सावरकरांवरील विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे, अशा शब्दात भाजप नेते, आमदार आशिष शेलारांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)
भाजप नेते, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पत्राता संदर्भ देत राहुल गांधींवर जोरदार टीका केली.
आशिष शेलार म्हणाले, 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पत्रात विनायक दामोदर सावरकरांचा उल्लेख हा वीर सावरकर असा करतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काल, बुधवारी वीर या शब्दावर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्यांच्या आजीचे पत्र देखील वाचलं नाही'.
'राहुल गांधींनी नेहरूंना वाचलं नाही. इंदिरा गांधींचा अभ्यास करू शकत नाही. आता केवळ केरळमध्ये निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं या पुरताच अभ्यास केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे विधान बेअक्कलपणा आहे, अशा शब्दात शेलार यांनी राहुल गांधींवर टीका केली.
यावेळी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार टीका केली. 'खरंतर भारताची ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या उद्धवजी ठाकरेंनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, असे वाटत होते. पण सत्तेसाठी माती खाल्लेल्यांनी स्वतःच्या वडिलांच्याही विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरे तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली?' असा सवाल शेलार यांनी ठाकरेंना केला.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सक्रीय प्रयत्न केले होते. महात्मा गांधींनी त्याकाळी संघ कार्यक्रमात हजेरी लावली होती. सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. उद्धव ठाकरे या इतिहासापासून अनभिज्ञ आहेत. जे स्वतःच्या वडिलांचे विचार विसरले, त्यांच्याकडून इतिहासाच्या आकलनाची अपेक्षा नाही, असेही शेलार पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.