अंबरनाथमध्ये भाजपकडून शिंदेसेनेची कोंडी, काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांच्या हाती 'कमळ'

Shinde Sena Setback After Congress Corporators: अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेला सत्तापासून दूर ठेवत.. भाजपनं शिंदेसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात जोरदार धक्का दिलाय... त्यामुळे अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची भाजपनं कशी कोंडी केली?
BJP leaders celebrate after gaining control of the Ambernath Municipal Council, dealing a major blow to Shinde Sena’s stronghold.
BJP leaders celebrate after gaining control of the Ambernath Municipal Council, dealing a major blow to Shinde Sena’s stronghold.Saam Tv
Published On

अंबरनाथमधील भाजप- काँग्रेस युतीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी 12 नवनिर्वाचित नगरसेवकाचं निलंबन केलं... आणि त्यानंतर भाजपनं राबवलेल्या ऑपरेशन लोटसला हात देत... काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी थेट भाजपात पक्षप्रवेश केलाय...रवींद्र चव्हाणांनी हा पक्षप्रवेश विकासासाठी असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणारं भाजप काँग्रेसयुक्त झाल्याची टीका हर्षवर्धन सपकाळांनी केलीय..

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला ...गेल्या 25 वर्षांपासून इथे शिवसेनेची एकहाती सत्ता होती... मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेसेनेला याचं बालेकिल्ल्यात भाजपनं धुळ चारली...अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुळेना नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर आता शिंदेसेनेला भाजपनं अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून दुसरा मोठा धक्का देत सत्तेच्या चाव्या आपल्या हाती हिसकावून घेतल्या.

अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेचे 27 आणि एक अपक्ष असे 28 नगरसेवक निवडून आले...तर भाजपचे 14 आणि एक अपक्ष असे 15 नगरसेवक निवडून आले..तर दुसरीकडे काँग्रेसचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निवडून आले... मात्र काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानं अंबरनाथमध्ये भाजपची एकूण नगरसेवकांची संख्या 27 झाली.. त्यात अजित पवारांची राष्ट्रवादीही भाजपसोबत अंबरनाथ विकास आघाडीत असल्यानं एकूण संख्याबळ 31 वर पोहोचलयं...

एकीकडे शिंदेसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप आक्रमक झाली असतानाच शिंदेसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार असल्याचीही चर्चा रंगलीय... मात्र निवडणुकीआधी झालेल्या युतीशी फारकत घेऊन शिंदेसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाईल, अशी शक्यता कमी आहे... त्यामुळे अंबरनाथचा बालेकिल्ला हातून निसटल्यावर शिंदेसेना राज्यात भाजपशी कसं जुळवून घेते... भाजपचा हा वार शिंदेसेना नेमका कधी आणि कसा उलटवून लावणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com