मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात (Kokan) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते मोदी एक्सप्रेसला नारळ अर्पण करून हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्यानंतर ही एक्सप्रेस सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली.
कोकणामध्ये मोठ्या उत्सवात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. मुंबईमध्ये कामाला असलेले बहुतांश कोकणवासी गणेशोत्वासाठी आपल्या गावी जातात त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितलं.
मोदी एक्सप्रेसला (Modi Express) हिरवा झेंडा दाखवल्यावरती प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मुंबईतील कोकणवासीयांसाठी अशा प्रकारची मोदी एक्सप्रेस सोडत आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासीय चाकरमानी राहतात आणि आता या महागाईच्या काळामध्ये त्यांना काही दिलासा मिळावा आणि सुखरूप आपल्या गावी जाता यावं याची काळजी भारतीय जनता पार्टीने घेतली आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने मोदी एक्सप्रेस कोकणवासीय चांकरमान्यांठी सोडण्यात येतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरिबांच्या कल्याणासाठी शेवटच्या माणसाचा विचार करायचा हा संस्कार भारतीय जनता पार्टीचा आहे.
कोकणातला सर्वात मोठा उत्सव गणेश उत्सव असतो आणि या मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून गणपती बाप्पा मोरया करत भाजपचा जयजयकार करत कोकणात त्या ठिकाणी मुंबईकर जाणार असल्याचं दरेकर म्हणाले.
गणेशोत्सवासाठी भाजपकडून ५०० बसेसची देखील सोय -
गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत काल ३० बसेस रवाना झाल्या. विशेष बाब म्हणजे या बसमधून तब्बल २० हजाराहून अधिक प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.