भाजपला राऊतांच्या संपत्तीची गरज नाही; प्रवीण दरेकरांचा प्रतिसवाल

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली
Praveen Darekar on Sanjay raut
Praveen Darekar on Sanjay rautSaam Tv
Published On

मुंबई: मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. ही ईडीची (ED) मोठी कारवाई मानली जात आहे. ईडीनं राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील (Mumbai) दादर येथील संपत्ती जप्त केली आहे. संजय राऊत यांनी असत्यमेव जयते अशा प्रकारचे ट्विट केले आहे. ज्या दिवशी कारवाई आपल्याकडे येते, त्यावेळेस असत्यमेव जयते म्हणून चुकीची कारवाई (Action), ज्या दिवशी हि कारवाई दुसऱ्या लोकांवर होते. त्यावेळेस आपल्याला आनंदाच्या उकळ्या येतात. ED जेव्हा कारवाई करते, त्यावेळेस तुमच्यावर असणारे उत्पादनाचा स्रोत तुमच्या असणाऱ्या प्रॉपर्टी आणि या गोषीसाचे जर संतुलन झालं नाही, पैसा कुठून आला हे सिद्ध करू शकला नाही. तर त्या वेळेस ED ची कारवाई होत असते.

हे देखील पहा-

१ एकराची जागा ही अलिबागमध्ये (Alibag) ती कोट्यवधींचीच असणार आहे, दादर सारख्या स्टेशनला टॉवरमध्ये फ्लॅट तो देखील कोट्यवधींचा असणार आहे, मग त्यामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो. तर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) सारखा कार्यकर्ता श्रीमंत मजूर हा श्रीमंत झाल्यावर तात्काळ गुन्हा दाखल करतात. अटक करण्याची मागणी करतात. आता या पत्रकारांच्या इतक्या प्रगतीशीर वाटचालीचे सुद्धा काय घमक आहे. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अनेक पत्रकार आहेत. त्या देखील शिकायला मिळेल. एवढ्या गतीने अलिबाग सारख्या ठिकाणी, दादरला टॉवर आणि एवढी मालमत्ता करण्याच्या यशाचं घमक काय? यावर राज्यातील पत्रकार आर्थिक प्रगती करू शकतात.

Praveen Darekar on Sanjay raut
हरणाची शिकार करून करत होते मांस विक्री; वनविभागाने ठोकल्या बेड्या

अलिबागमधील जमिनी आणि इतर मालमत्ता, तसेच दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीची काही दिवस चौकशी सुरू होती. गेली दोन महिने राऊत यांची जी धडपड, धावपळ, आणि ईडीवर आरोप करणे आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि कुटुंबीयांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकत होतो. अलिबागमध्ये चौकशी झाली त्यावेळी काय काय केलं हे सगळं माहीत होतं, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसंच राऊतांना या कारवाईबाबत आधीच लक्षात आले होते म्हणून त्यांनी 55 लाख ईडी कार्यालयात परत केले होते असा खुलासा देखील सोमय्या यांनी केला.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com