ओ… भास्करशेठ तुम्ही नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा; चित्रा वाघ भडकल्या

शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
BJP Chitra Wagh vs Shivsena Bhaskar Jadhav
BJP Chitra Wagh vs Shivsena Bhaskar Jadhav Saam TV
Published On

BJP Chitra Wagh vs Shivsena Bhaskar Jadhav : शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भारतीय जनता पार्टीच्या (BJP) महाराष्ट्रातील महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भास्कर जाधव यांनी कथित पूजा राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ यांना टोला लगावला होता. यावर उत्तर देताना 'ओ…भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही “नाच्या” च काम चांगल करतां तेच करा, माझ्या नांदी लागू नका', असं उत्तर दिलं आहे. (Chitra Wagh News Today)

BJP Chitra Wagh vs Shivsena Bhaskar Jadhav
Kokan News : ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपच नंबर १ : मंत्री रविंद्र चव्हाण

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

कुडाळ येथे कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांची नक्कल करत उपरोधिकपणे संजय राठोड यांना भाजपाने पुन्हा मंत्री केल्याने पूजा चव्हाणला न्याय मिळाला असं म्हटलं होतं. संजय राठोड यांना लक्ष्य करताना जाधव यांनी चित्रा वाघ सध्या कुठे आहेत? असा खोचक प्रश्नही भास्कर जाधव यांनी विचारला होता. (Maharashtra News)

इतकंच नाही तर, 'त्या मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला. ज्या पद्धतीनं तिनं आत्महत्या केली. त्या आत्महत्येच्या पाठीमागे संजय राठोडच आहेत अशापद्धतीने भाजपाने महाराष्ट्रात आरोपाची राळ उठवली गेली,' असं जाधव यांनी म्हटलं होतं.

BJP Chitra Wagh vs Shivsena Bhaskar Jadhav
Maharashtra News : दिवाळीआधीच गोड बातमी! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच

भास्कर जाधवांना चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या या उपरोधक टोल्याला चित्रा वाघ यांनी प्रत्त्युतर दिलंय. 'ओ….भास्करशेठ तुम्ही आधीपण आतापण ही “नाच्या” च काम चांगल करतां तेच करा, माझ्या नादी लागू नका, जेव्हा पूजा चव्हाण साठी मी लढत होती, तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात कि तोंडाला लकवा मारला होता? तुमच्या तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही आम्ही आमच्या जीवावर लढतो. याद राखा, आमच्या नांदाला लागू नका', असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com