

सूरज मसूरकर
Bhiwandi News : भारतीय जनता पक्षाची कार्यशाळा आज भिवंडीतील साया ग्रँड क्लब येथे पार पडत आहे. कार्यशाळेला भाजपचे सर्व आमदार-खासदार उपस्थित आहेत. या कार्यशाळेला आलेले ३ आमदार लिफ्टमध्ये अडकले होते. प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले हे आमदार लिफ्टमध्ये अडकले होते.
यावेळी भाजप नेत आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या आमदारांच्या मदतीला धावून आले आणि त्यांची सुटका केली. लिफ्टचा दरवाजा वाकवत गिरीश महाजन यांनी आमदारांना बाहेर काढले. (Maharashtra Politics)
बराच वेळ लिफ्टमध्ये अडकल्याने नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यावेळी प्रविण दरेकर यांनी त्यांना आधार दिला. (Latest Marathi News)
भाजपने महाराष्ट्रात २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान हाती घेतले आहे.
या अभियानांतर्गत पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांचा प्रशिक्षण वर्ग भिवंडी येथे पार पडत आहे. या प्रशिक्षण वर्गास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख मार्गदर्शन करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.